विलास काळे, म्हणजे विलास के, हा आपला स्वदेशी विलास बरं का ! (गेल्या महिन्यात वाढदिवस होता तो परदेशी, विलास पी.)
पण विलास काळेचं व्यक्तिमत्व असं आहे कि विदेशी चित्रपटातदेखिल शास्त्रज्ञ किंवा प्रोफेसरच्या भूमिकेत फिट्ट बसेल. उंचापुरा, गौरवर्ण, शांत, संयमी बोलणं. (तूर्तास हेअरस्टाईल बाजूला ठेवू)
मित्रांनो बालपणी आपला रेल्वेप्रवास म्हणजे सणासुदीला पालकांच्या देखरेखीखाली व्हायचा आणि हा पठ्ठ्या शाळेत रोज ट्रेनने यायचा. कित्ती मज्जा ! लहानपणी थोडं आकर्षण असतंचना ट्रेनचं (मोठेपणी तोच रेल्वेप्रवास म्हणजे सजा होते). असो!
शाळेत असतानाचा ऑपिंगो-बैठिंगो नावाचा खेळ आठवतोय का? म्हणजे ऊभं रहाताना ऑपिंगो बोलायचं, बसताना बैठींगो बोलायच, जर बोलायला विसरलात तर ज्याच्याशी ऑपिंगो-बैठिंगो लावलायतं तो तुम्हाला पाठीत फाईट मारणार. त्यात मी विलासकडून मजबूत मार खाल्लायं. अर्थात त्यात विलासची चूक नव्हती, माझ्या अंगातील अमिबामुळे मी त्याच्याशी ऑपिंगो-बैठिंगो लावलं होत. तेसुद्धा माझ्या शरीरयष्टीचा विचार न करता. तसं मीपण मारायचो त्याला माझ्या ऐपतीप्रमाणे.
विलासचे करीअर वैविध्यपूर्ण आहे. माझगाव डॉक मध्ये अप्रेंटीसशीपसोबतच अर्धवेळ इंजिनिअरिंग पूर्ण केल. त्यानंतर सिंगापूर मध्ये जहाजबांधणी उद्योगात नोकरी. ऑस्ट्रेलियन विद्यापीठातून एम.बी.ए. तदनंतर ई.आर.पी. सॉफ्टवेअर विक्रीचा अनुभव. असा जवळपास एक तपाचा कालावधी परदेशी वसल्यानंतर, भारतात पुनरागमन. कौतुकाची गोष्ट म्हणजे भारतात येऊन त्याने नोकरी न करता व्यापाराची वाट धरली. कष्ट घेण्याची तयारी, मेहनत, जिद्द, चिकाटी आणि हुशारी (जी दहावी-अ मध्ये आपोआप येते) ह्या गुणांच्या जोरावर तो व्यापारात बऱ्यापैकी स्थिरस्थावर आहे. विलास, मित्रा उत्तरोत्तर तुझा असाच ऊत्कर्ष होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
विनायक5 years ago
संजय डी.5 years ago
रविदत्त5 years ago
प्रदीप5 years ago
विनोद5 years ago
गीता5 years ago
वर्षा एस.5 years ago
सुनील5 years ago
राजश्री5 years ago
दयानंद5 years ago
संजय के.5 years ago
महेश5 years ago
समीर5 years ago
दिगंबर5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा