आजचा लोकसत्ता चाळताना वरील शीर्षकावर नजर गेली. मिठी शब्दाने जिज्ञासा चाळवली. मुंबईकर असल्याने मिठी नदीसंबधी काही बातमी असावी म्हणून मजकूर वाचण्यास घेतला.
केंद्रीय पशूकल्याण मंडळाने पशुप्रेमापोटी जो निर्देश दिला होता त्यावर माझी शिंगचं टेकली. 🤭जरी निर्देश फक्त गो-मिठीचा असला तरी समस्त पशुवर्गातर्फे मी मंडळाचे आभार मानतो. बहूधा ज्यांना 'कोणी मिठी मारत नाही' अशा काही मानवांनी असूयेपोटी ह्या निर्णयावर टीका केल्याने निर्देश मागे घेण्यात आला. समजा व्हॅलेंटाइन-डे चा प्रभाव कमी करण्यासाठी 'काऊ-हग-डे' साजरा झाला असता तर ...🤔
ग्रामीण भागात मिठी मारण्यासाठी गाई सापडतील. पण आम्हां शहरी गो-प्रेमींसाठी ते थोडं कठीणच. काही ठराविक ठिकाणी गोग्रास भरवण्यासाठी काहीजण गाई घेऊन बसलेले असतात. लोकसंखेच्या मानाने हे प्रमाण व्यस्तच असत त्यामुळे गो-मिठी साठी अशा ठिकाणी लांबच लांब रांगा दिसल्या असत्या. पाच-दहा रुपये खर्च करून 'गो-मिठी' घेता आली असती. व्हॅलेंटाइन-डे ला होणाऱ्या खर्चासमोर हे काहीच नाही. पुण्यसंचय झाला असता तो वेगळाच.
'गाईस मिठी कशी मारावी?' यासंबंधी विशेष निर्देश नसल्याने तिथे थोडा गोंधळ उडण्याची शक्यता होती. समजा काही अतिउत्साही प्रेमींनी आलिंगनासोबत चुंबनचा प्रयत्न केल्यास भलतेच प्रसंग निर्माण झाले असते.
प. क. मंडळाचे निर्देश गाईंनी वाचलेले नसल्याने त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळेल हा वेगळाच प्रश्न! काहीजणांना शिंगाचा, लत्ताप्रहराचा प्रसाद देखील लाभला असता. असो! आता निर्देश मागे घेण्यात आल्याने जास्त रवंथ करण्यात काही अर्थ नाही. येता व्हॅलेंटाइन-डे आपापल्या हिशोबाने मिठ्या मारत साजरा करा किंवा करू नका. Choice is yours !!! 🤪
प्रभा2 years ago
अनिता2 years ago
वर्षा एस.2 years ago
मनीषा बी.2 years ago
सुमित2 years ago
वैशाली2 years ago
अनिल जी.2 years ago
शशिकांत2 years ago
चारू2 years ago
भाग्यश्री2 years ago
स्वप्ना2 years ago
सतीश2 years ago
जगदीश2 years ago
वंदना2 years ago
अक्षता 2 years ago
संदीप2 years ago
सायमन2 years ago
प्रतिमा2 years ago
अजित2 years ago
निलेश2 years ago
जतीन2 years ago
सिद्धेश2 years ago
उदय2 years ago
नेत्रा2 years ago
अमित2 years ago
वर्षा2 years ago
आशिष2 years ago
गणेश2 years ago
संजय के.2 years ago
प्रदीप2 years ago
प्रकाश2 years ago
विनायक2 years ago
संतोष एम.2 years ago
विजय2 years ago
दयानंद2 years ago
सुनील2 years ago
विलास पी.2 years ago
विनायक एस.2 years ago
राजश्री2 years ago
रोहित2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा