सर्व रंगभूमी रसिकांना आज जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐
आपल्या ग्रुपमध्ये एकापेक्षा एक रंगभूमी कलाकार आहेत याची जाणीव मला आहे. तरीही आज माझा रंगभूमीवरील दैदिप्यमान प्रवास तुमच्यासोबत शेअर करणे समयोचित होईल.
शाळेत असताना वेशभूषा स्पर्धेच्या निमित्ताने माझं रंगभूमीवर पदार्पण झालं. त्यानंतर मी कधी मागे वळून पाहिल नाही...रंगभूमीकडे. नक्की आठवत नाही, पण बहुतेक इयत्ता पहिलीत असेन. मी वेशभूषा स्पर्धेत भाग घेतला होता की कोणी घ्यायला लावला होता. त्याकाळी वेशभूषेत दहामध्ये तीन तरी कृष्ण असतं. मीपण कृष्णचं बनलो होतो. 👍
माझ्यापेक्षा जास्त उत्साह आमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना होता. कृष्णाला सजवायला आमचा सगळा मजला जमला होता. (यावरून गोकुळात खऱ्या कृष्णाचे किती लाड होत असतील बघा! 🥰) मोरपीस लावलेला मुकूट, बासरी, पीतांबर लेवून कृष्णाची स्वारी पायीपायीच शाळेकडे रवाना झाली. तोपर्यंत मजा वाटत होती.
शाळेत स्टेजच्या बाजूला सगळे स्पर्धक जमले होते. पडदा बंद असताना स्पर्धक स्टेजवर जात असे, बेअरींग घेत असे, मग पडदा उघडला जाई. स्पर्धकाचे टाळ्यांनी स्वागत होई. मला विंगेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी भरलेले प्रेक्षागार दिसत होते. मला हळूहळू भीती वाटायला सुरुवात झाली होती. 😢
माझा नंबर आला. बंद पडद्यामागे कृष्णाच्या अविर्भावात बासरी धरून उभा राहिलो. पडदा उघडला आणि... क्षणाचाही विलंब न लावता कृष्ण पळून विंगेत आला. टाळ्यांसोबत हशांही मिळवला. पुन्हा कोणीतरी धरून जबरदस्तीने स्टेजवर आणलं.. पुन्हा पळालो. मग कोणीतरी दोन मिनिटे डोळे बंद करून स्टेजवर उभं राहायला सांगितलं. डोळे उघडताच कृष्णाचं रणछोडदास हे नाव सार्थ करीत पुन्हा पलायन! 🏃🏻♂️
अशा रितीने माझ्या आतापर्यंतच्या जीवनप्रवासातील साधारण पाच मिनिटांचा कालावधी रंगभूमीवर घालविला आहे. मी रंगभूमीची ही पाच मिनिटांची जी सेवा केली, त्यानिमित्त कोणतीतरी नाट्यसंस्था मला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करेल अशी आशा बाळगून आहे. 🙏
राजश्री4 years ago
गीता4 years ago
प्रशांत4 years ago
संजय डी.4 years ago
विलास के.4 years ago
अनिल4 years ago
विनायक4 years ago
दयानंद4 years ago
प्रसाद4 years ago
समीर4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा