आज आपल्या माधुरीचा वाढदिवस. माधुरी दिक्षित... ज्या काही मोजक्या मराठी कलावंतांनी बॉलीवूडमध्ये ठसा उमटविला त्यातील एक. वाढदिवस ५४ वा पण आजही तिच्या मनमोहक अदा रसिकांना घायाळ करतात.
माधुरी म्हटल की तेजाब मधील 'एक दो तीन' , बेटा मधील 'धक धक करने लगा' आठवतं. त्या गाण्यानंतर तर ती धक धक गर्ल म्हणूनच प्रसिद्ध झाली. चेहऱ्यावर अवखळ हास्य आणि हाय्य ऽऽ ! म्हणायला लावणाऱ्या अदाकारीने तिने आमच्या पिढीला वेडचं लावल होत.💞
१९८४ मध्ये 'अबोध' चित्रपटातून माधुरीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केल. त्यानंतर 'तेजाब', 'राम लखन', 'परिंदा', 'दिल', 'दिल तो पागल है', 'हम आपके हैं कौन', 'देवदास', 'पुकार', 'लज्जा' सारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. लाजबाब, दिलखेचक नृत्यकला आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल. एखाद्या सम्राज्ञीप्रमाणे!👸
आणि एक दिवस अमेरीकेतील डॉक्टर श्रीराम नेनेंशी विवाह करून अमेरिकेत निघून गेली...हजारों दिल टुटे और आह तक नही आयी...💔
रसिकांच्या प्रेमाची ताकद म्हणा किंवा अभिनयाची ओढ म्हणा, बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी माधुरी पुन्हा भारतात आली. पण इथे गंमतीची गोष्ट म्हणजे श्रीराम नेने सुद्धा अमेरीका सोडून भारतात आले माधुरीसोबत. 😍
सुनील4 years ago
अभिजित4 years ago
संजय डी.4 years ago
नेत्रा4 years ago
दयानंद4 years ago
महेश4 years ago
गणेश4 years ago
संतोष एम.4 years ago
प्रकाश4 years ago
प्रदीप4 years ago
वर्षा एस.4 years ago
विनोद4 years ago
गीता4 years ago
प्रसाद4 years ago
नीना4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा