८ ऑगष्ट २०२१

🥇 तू फेकताच भाला!

नीरज चोप्राच्या भालाफेकीने ऑलिंपिक सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि संपूर्ण भारतभर एकच जल्लोष झाला. हॉकीच्या सुवर्णकाळानंतर भारतासाठी सुवर्णपदक म्हणजे अप्राप्य गोष्ट झाली होती. भारताचं मागील सुवर्णपदक चक्क १३ वर्षांपूर्वी ( अभिनव बिंद्रा - 2008 बीजींग ऑलिंपिक - 10 मी. एअर रायफल). सोनं कमी नाही भारतात पण ऑलिंपिक सुवर्णपदकांची मात्र वानवा आहे.

भारतीय सेनेत असलेल्या नीरज चोप्राची गेल्या काही वर्षातील भालाफेक मधील कामगिरी उच्च श्रेणीची होती. २०१८ च्या आशियाई आणि कॉमन वेल्थ गेम मध्ये त्याला गोल्ड मेडल आहे. पण आपल्याकडे क्रिकेट सोडल तर बाकी खेळांना फारस ग्लॅमर नाही. लोकांना प्रेम चोप्रा, प्रियांका चोप्रा माहित असतात. पण नीरज चोप्रा नाव सर्वतोमुखी होण्यासाठी ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवावं लागत.

नीरज, तू केलल्या दैदिप्यमान कामगिरीचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

आता भालाफेक सुवर्णपदकाचे आफ्टर इफेक्ट्स...

सोशल मीडिया तर नीरजच्या नावाने ओसंडून वाहत होता.नीरजच्या फॉलोव्हर्स ची संख्या २ लाखांवरून डायरेक्ट २० लाख. म्हणजे त्यात काही चुकीचं नाही. आपले आपापसात कितीही वाद असले तरी भारतीय तिरंग्याखाली सगळे एकत्र असतात. सुरुवातीच्या अर्ध्या तासात नीरजच गुणगाणं आणि मग सोशल मीडियावर राजकीय भालाफेक सुरु. मध्येमध्ये मिम्सचीही फेकाफेकी. ह्यामध्ये आपण भारतीय एकदम एक्स्पर्ट.😃

अजून एक गोष्ट होते, अचानक भालाफेक ह्या खेळाला ग्लॅमर प्राप्त होते. अ‍ॅमेझॉन इंडियावर भाले आउट ऑफ स्टॉक होतात, कारण अतिउत्साही पालकांनी ऑनलाइन ऑर्डर केलेले असतात. पुढच्या ऑलिंपिक पदकासाठी..... आणि महिन्याभरातच काही पालक त्या भाल्याचा उपयोग दोरीवर कपडे वाळत घालण्यासाठी करताना दिसतात. Oh! Darling That's My India. I Love My India.❤️

नीरज चोप्राचे पुन्हा एकदा अभिनंदन !!!

तू फेकलेला भाला करोडो भारतीयांच्या हृदयावर तुझं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून गेलाय.👍

You can Like, Share & Comment
- संतूवाणी

दिनविशेष

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

किसन4 years ago

👏👌👍

अवधूत4 years ago

संत्या,तू फेकताच भाला आमचा खल्लास झाला
आज गताहारी असल्याने कलिजा टोपात रटरटतोय😜

प्रदीप4 years ago

खरंय..तू फेकाताच भाला...कलिजा खल्लास झाला..👍🥇🥇
शाळेत भाला फेकी पेक्षा खडू/ डस्टर फेका फेकी जास्त अनुभवली...नाहीतर एखादा नेम आमचा पण लागला असता..😉😜

संजय डी4 years ago

अतिशय समर्पक प्रासंगिक. अभिमान वाटावा अशी कामगिरी आहे नीरजची.🥇

रविदत्त4 years ago

निरज चोप्रा च्या भाल्याला संतूवाणीची झळाळी म्हणजे सोने पे सुहागा. संतोष खुप छान तुझ्या लिखाणाचे वाचन निखळ आनंदाची प्रचिती देते.

गणेश4 years ago

👍 छान.... 👌👌👌

विनायक4 years ago

मी aasha करतो की जास्तीत जास्त लोक यामुळे प्रेरित होतील आणि भारताला भविष्यात अधिक मेडल्स मिळतील

सुनील4 years ago

👍🏼👍🏼👍🏼🎉🎉🎉

राजश्री4 years ago

🙏🙏

संजय के.4 years ago

👌👌🙏

अनिल4 years ago

👍👍👌👌

प्रशांत4 years ago

👌👌👌

विनोद4 years ago

मस्त

शैलेश के.4 years ago

फारच सुंदर 👌👌👌

दयानंद4 years ago

👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻

नेत्रा4 years ago

👌

प्रसाद4 years ago

👌👌👌

नितीन4 years ago

👌

विनय4 years ago

👍

संतोष एम.4 years ago

👌🏻👌🏻👌🏻

नरेश4 years ago

👌👌

अभिजित4 years ago

👌👌👍

दिलीप4 years ago

👌👌

विलास पी.4 years ago

👌🏼👌🏼👌🏼
Read more in this section:
रात्रीस खेळ चालेवादा तेरा वादावादा - कोथिंबीरीचादिन दिन दिवाळीरंगभूमी दिनधक धक गर्लकालिदास दिनतू फेकताच भाला!सूर तेच छेडितागुरूपौर्णिमा सोशलव्हॅलेंटाइन डेसुहाना सफर - गरबानिसर्ग मेळासुहास शिरवळकरगो-मिठी दिन
Close Video ❌
Share