२७ जून २०१९

⛈ शाळेतला पाऊस ☂

येरे येरे पावसा, तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा

असे म्हणत मोठी झालेली आमची पिढी अन् Rain Rain Go Away, Little Jhony Wants To Play शिकणारे आजचे चिमुकले. अरे जॉन्या, एकदा पावसात भिजून तरी बघ लेका!

बालपणीचा पाऊस बालमनासारखा निरागस, अल्लड! धो धो पडणाऱ्या पावसात आईचा हात धरून , मस्त रेनकोट घालून शाळेत जाणे-येणे म्हणजे मज्जाच मजा! मोठ्यांची नजर चुकवून हळूच पावसात भिजण्याची गंमत. पावसाळ्यात आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे कोण अप्रुप!! 🌈

पाणी साचलेल्या मैदानात कागदाच्या होड्या सोडणे. त्याकाळी मी इतका श्रीमंत होतो की पावसाळ्यात माझी दहा पंधरा कागदी जहाज चालतं समुद्रात (मैदानातल्या) ⛵. शाळेत शिकवलेली पंखहोडी, नांगरहोडी, राजाराणीची होडी, बंबहोडी तयार करून हस्तकलेच्या वहीत चिकटवणे हीपण एक कला होती. आता साधी होडी बनवता येते का बघा प्रयत्न करून 😀 • •

वीज चमकणे म्हणजे आकाशातून कोणीतरी फोटो काढला समजणे आणि ⚡ वीजेचा गडगडाट म्हणजे आकाशातील घुडूऽऽम् म्हातारी दळण दळतेय. कसल्या मजेशीर कल्पना होत्या विज्ञानाच्या पलिकडल्या! वीज कडाडल्यावर मात्र मी घाबरून घरात धूम ठोकत असे. पावसामुळे शाळेला मिळणारी सुट्टी म्हणजे लॉटरीच. पावसात थोडसं जरी डोक भिजलं तरी, सर्दी होऊ नये म्हणून स्वतःच्या पदराने आपलं डोक पुसणारी आईची माया!

थोडे मोठे झालो आणि मराठीच्या तासाला ...

श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षंणात येते सर सर शिरवे
क्षंणात फिरुनि ऊन पडे
ही बालकवींची कविता समजू लागली. लहानपणीचा रेनकोट गेला आणि छत्री हाती आली. आता, भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ! विनाकारण पावसात भिजत फिरणे. मित्रांसोबत पावसात ⚽ फुटबॉल खेळणे. बिनधास्त मैदानातील चिखलात पडणे. तेव्हा तर किटाणूनाशक साबणपण नव्हते आणि किटाणूंची हिम्मत पण नव्हती आमच्यावर हल्ला करायची.

घरच्यांचा धाक मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असे, पण त्याक्षणी मित्रांसोबत पावसाचा आनंद घेणे ह्यापेक्षा महत्त्वाचं काहीचं नव्हतं. तर असा हा बालपणीचा पाऊस 🌨
वो कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी ह्या गझलची आठवण करून देणारा.

• कॉलेजमधला पाऊस
मनी पाऊस दाटलेला
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

काही विशेष

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

संजय के.6 years ago

मजा यायची पावसात👌आम्ही भाड्याच्या सायकल घेऊन मैदानात साठलेल्या पाण्यात जायचो 👌👌

रविदत्त6 years ago

संतोष पावसाळी feel मस्तच👌

गीता6 years ago

धन्यवाद संतोष . तुझी संतु वाणी आली या ग्रुप वर . आता जरा मराठी ग्रुपमध्ये असल्यासारखे वाटते .
नाहीतर मागचे दोन आठवडे मी चुकून फोरोजीन ग्रुप जॉईन केला की काय असे वाटत होते .🤩🤩🤩

राजश्री6 years ago

👌👌शब्द अपुरे

गणेश6 years ago

छान लेख, संतू.. 👌👌👌

सुनील6 years ago

सुंदर नेहेमीप्रमाणे👌🏽👌🏽👌🏽

विजय6 years ago

अतिशय सुंदर संतोष

विनायक6 years ago

Great Santosh.

समीर6 years ago

संतू ,आठवणीतला पाऊस मस्त रेखाटलास🙏👍🏻

प्रदीप6 years ago

पुनश्च: मस्त..👌👌

किर्ती6 years ago

सुंदर वर्णन

संजय डी.6 years ago

कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन 😌

नेत्रा6 years ago

👌

प्रसाद6 years ago

😍😍😍

मनोहर6 years ago

👌👌

नीना6 years ago

👌👌

प्रशांत6 years ago

👌👌👌

अवधूत6 years ago

👌🏻👌🏻👌🏻

संतोष एम.6 years ago

👌🏻👌🏻👌🏻

नरेश6 years ago

👌👌
Read more in this section:
माझा भूत काळआटपाटनगर लोकशाहीदहावीचे ९० टक्केमालवणी गब्बरशुभेच्छांवर बोलू काहीओऽ शीटअपना टाईम आयेगा?९० टक्क्यांची नवलाईथोडसं मनातलं...काटा कमळात रूतलामंडळ आभारी आहेशाळेतला पाऊसकॉलेजमधला पाऊसमित्रास पत्रवरसंशोधनव्यायामाची शाळा - पूर्वार्धव्यायामाची शाळा - उत्तरार्धप्याक-प्याक बदक पळालाओळख-पाळखवाढदिवस सरप्राइजमनी पाऊस दाटलेलालेकुरे उदंड जाहली
Close Video ❌
Share