बालपणीच्या चिऊ-काऊ नंतर अंकलिपीत ओळख होणारा बदक हा बहुधा पहिला पक्षी. 'अ' अननसाचा नंतर 'ब' बदकाचा. 'बदक' लिहायलापण एकदम सोप्पा. काना , मात्रा, आकार, उकार कशाचंच ओझं नसलेला. लहानपणी बदकाचं चित्रं काढायला पण सहज जमतं.
बदक हा पक्षी असून पोहतो आणि स्वत:च्या जीवावर जमेल तेवढं उडतो. जमिनीवर डुलतडुलत चालू शकतो, धावू शकतो. अशी बहुविध प्रतिभा असताना केवळ रंगीबेरंगी पिसारा नसल्याने बदक आपला राष्ट्रीय पक्षी होऊ शकला नाही. (सध्या जमानाचं शोबाजीचा आहे)
मयूरनृत्य🦚 सुंदर असतं असं म्हणतात. लेकीन 'जंगल में मोर नाचा किसने देखा' आणि त्या मोराला नाचण्यासाठी 'नाच रे मोरा आंब्याच्या वनात' अशी विनंती करावी लागते, वर पावसाचा माहोल बनवावा लागतो. तेव्हा कुठे त्याचा मूड झाला तर तो नाचणार. बिचाऱ्या बदकाचं तसं नाही. 'बदका बदका नाच रे तुझी पिल्लं पाच रे' असं बडबडगीत म्हटलं तरी त्याला नाचावं लागतं. आता तुम्हीच सांगा पाच पिल्लं हे नाचण्याच कारणं होऊ शकतं का?😃 पण बदकाला नाचावं लागतं.
पुढे पुढे आपल्या भाषेतसुद्धा बदकावर अन्याय दिसतो. 'चोरावर मोर' यात चोर आणि मोर यांचा परस्पर काही संबंध नाही मग 'चोरावर बदक' का नाही? प्रेमात पडलात कि 'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला' ज्यांच्या मनाला पिसारा नाही त्यांच्या प्रेमाचं काय? 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख' ह्या सुंदर गाण्यात बदकाला सुरेख म्हटलं आहे. पण गाण्याच्या शेवटी राजहंस बाजी मारून जातो.
क्रिकेटमध्येसुद्धा शून्यावर आउट झालं कि बदक (डक) मिळतं. पहिल्याच चेंडूवर बाद झालात तर गोल्डन डक. म्हणजे सोन्याचा मुलामा देऊन टर उडविणे. एक जगप्रसिद्ध बदक मात्र असा आहे त्याने प्रसिद्धीच्या बाबतीत साऱ्या मोरांवर मात केली आहे. डिस्नेचा 'डोनाल्ड डक'.
प्रथमेश के.3 years ago
अक्षता3 years ago
विलास पी.3 years ago
भाग्यश्री3 years ago
पल्लवी3 years ago
वर्षा एस.3 years ago
प्रशांत3 years ago
अवधूत3 years ago
संजय के.3 years ago
नेत्रा3 years ago
शैका3 years ago
प्रसाद3 years ago
विनायक3 years ago
दयानंद3 years ago
जगदीश3 years ago
समीर3 years ago
प्रदीप3 years ago
सायमन3 years ago
निकेता3 years ago
चारू3 years ago
दिलीप3 years ago
प्रभा3 years ago
अनिल3 years ago
प्रकाश3 years ago
तृप्ती3 years ago
स्वप्ना3 years ago
रोहित3 years ago
अनिता3 years ago
नरेश3 years ago
विनायक एस.3 years ago
दिगंबर3 years ago
किसन3 years ago
अर्चना3 years ago
अजित3 years ago
संतोष एम.3 years ago
संध्या3 years ago
सुनील3 years ago
नीना3 years ago
हेमंत3 years ago
शेखर3 years ago
शशिकांत 3 years ago
राजश्री3 years ago
मनीषा बी.3 years ago
काका3 years ago
विनय3 years ago
वंदना3 years ago
महेश3 years ago
संजय डी.3 years ago
प्रतिमा3 years ago
संदीप3 years ago
प्रणव3 years ago
नितीन3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा