हल्ली पावसाळा जवळ आला कि सोशल मीडियावर पावसाळी मेसेजेसचा पाऊस येतो. मान्सून मात्र त्याच्या हिशोबाने त्याला पाहिजे तेव्हा येतो. आपण लहानपणापासून पावसाला खोटा पैसा देऊन बनवत आलोय, त्यामुळे आता पाऊस आपल्याला बनवतो. हवामान खात्याचे अंदाज हवेवर उडवून लावत पावसाचा धिंगाणा सुरु होतो. मोबाइल अॅपवर ऑर्डर देऊन ठराविक वेळेत पाऊस मागवण्याची सुविधा अजून तरी उपलब्ध नाही. त्यासाठी निसर्गावरच अवलंबून रहावं लागतं.
पाऊस आवडण्याची लहान-थोरांची वेगवेगळी कारणं असतात. 'ये रे ये रे पावसा' ह्या बालगीतापासून सुरु झालेला आमचा पाऊस वयात येत 'रिमझिम गिरे सावन', 'भिगी भिगी रातोंमे' ह्या युगुलगीतांपर्यन्त येतो. चित्रपटसृष्टीने तर ब्लॅक अँड व्हाइट जमान्यापासून ते आजतागायत पावसातली गाणी भरभरून दिलीयत. 'डम डम डिगा', 'प्यार हुआ इकरार हुआ' ते 'आज रपट जाए'...
काहींना पावसाळ्यात 'गारवा' अल्बममधील गाणी विशेष भावतात. अगदी त्यातील गाण्यांपूर्वीच्या सौमित्रच्या ओळीदेखील आठवतात "मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा. बघ माझी आठवण येते का?"... सगळ्यांना आठवण येईलचं असं काही नाही. म्हातारपणी विस्मरण होण स्वाभाविक आहे. 😀
पावसाळा हा निसर्गचक्रातला एक ऋतू परंतु... तुमचा आणि आमचा पाऊस सेम असेलच असं नाही. पावसाच्या सरींत ❤️प्रेमरस ते 🥃सोमरस अशी विविधता मिळते. आपापल्या तब्येतीप्रमाणे आस्वाद घ्यावा. गार गार पावसात निदान गरमागरम कांदाभजी आणि कटिंग चहाला तर कोणाचीच हरकत नसावी! ☕
चारूलता3 years ago
रविदत्त3 years ago
शशिकांत3 years ago
नितीन3 years ago
उदय3 years ago
वर्षा जी.3 years ago
अनिल जी.3 years ago
दयानंद3 years ago
स्वप्ना3 years ago
अक्षता3 years ago
रोहित3 years ago
जगदीश3 years ago
सिद्धेश3 years ago
तृप्ती3 years ago
संजय के.3 years ago
सुनील3 years ago
नरेश3 years ago
शैलेश के.3 years ago
सुरेश3 years ago
अनिल3 years ago
समीर3 years ago
विलास के.3 years ago
प्रशांत3 years ago
प्रकाश3 years ago
दिगंबर3 years ago
विकास3 years ago
विनय3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा