१६ मे २०२०
मालवणी गब्बर
संदर्भ: व्हाट्सअप ग्रुपमधील मित्रांच्या अभिनयकलेला प्रोत्साहन देण्यासाठी गब्बरचा संवाद साभिनय सादर करण्याचे ठरले होते. तेव्हा सुचलेली मालवणी गब्बरची थोडीशी गंमत.
गब्बर: किती मानसां होती
कालिया: दोन होती
गब्बर: दोन? त्येंची दोन मानसां होती आणि तुम्ही तीन, मेल्यानु तरी पण हात हलयतं परत इलास . तुमका काय वाटला सरदार खुश होतलो. शिरा पडली तुमच्या तोंडार ती. रे सांबा, तां तलाठयानं माझ्यारं किती बक्षीस लावल्यानं हां
सांबा: घंटा
गब्बर: काय ?
सांबा: नाय ती देवळातली घंटा वाजली ना. तसा टॅक्स कापून चाळीस हजाराचा बक्षीस आसा.
गब्बर: ऐकलास मायाझयानू! चाळीस हजाराचा बक्षीस काय भात आणि माशे खावचा काम नाय. रात्रीची पोरां रडाक लागली तर त्येंचे आवशी त्येंका सांगतत, गप रवा नायतर गब्बर मालवणकर येयतं. फटकीचो वाको इलो तुमच्यार, माती केलास रे माझ्या नावाची. आता भोगा आपल्या कर्माची फळां. माझी एअर गन खयं आसा. किती गोळये आसत हेच्यात?
सांबा: काय मोजूक नाय. पण सा आसतले.
गब्बर: मानसा तीन आणि गोळये सा , हिशोब काय जमना नायं.
सांबा: तुमका हिशोब जमलो असतो तर MIDC त नोकरी नसती गावली.
गब्बर: सांबा मेल्या तू माका शिकव नको. (तीन गोळ्या हवेत झाडतो ) आता ह्या बंदुकीचा चाक मी फिरवतंय, खयची गोळी खयं आसा देवाक ठावक. (दोघांना गोळ्या मारतो पण ते वाचतात) कालिया आता तुझा काय खरा नाय.
कालिया: सरदारांनु मी तुमचा मीट खाल्लय.
गब्बर: तरी मी ईचार करतय माझा मीट लवकर कसा संपता. अक्करमाशा आता गोळी खा.
(कालिया हसायला लागतो )
गब्बर: मेल्या, हसतस कित्याक?
कालिया: तेचा काय हा, काल रात्री हीच बंदूक घेऊन डुक्कर मारून गेल्लव , तीन गोळये फुकट गेले पण डुक्कर काय गावाक नाय आणि आता मोठेपना करूंक तीन गोळये तुमी हवेत झाडलास. तुमचा म्हंजे असा आसा धाक नाय दारारो नी, फुकटचो नगारो (सगळे डाकू हसतात तुम्हीपण हसा 😀)
You can Like, Share & Comment
- संतूवाणी
तुमची प्रतिक्रिया लिहा