आमचा दहावीचा टॉपर. विनायक हा हुशारी न दाखवणारा हुशार विद्यार्थी. हल्ली हुशारीचंपण मार्केटिंग करावं लागत. तरच लोक तुम्हाला हुशार समजतात. गंमत म्हणजे विनायकची मातृभाषा मराठी नसतानासुद्धा आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून तो दहावीला पहिला आला. म्हणजे मलाही हे खूप उशीरा कळल. (आधी कळलं असतं तरी मी पहिला आलो नसतो.) शाळेत असताना आपल्या वर्गात इमारत क्र. ११ ची मोठी गॅंग होती, त्या गॅंगचा हा पंटर.
विनायक हा आपल्या ग्रुपमधील वाचनीय पोष्ट टाकणारा एक सक्रिय सभासद. विशेष गुण म्हणजे सक्रिय असला तरी राजकारणापासून दूर असतो. माझ्यासारखे काही बुद्धिजीवी(?) मित्र तावातावाने चर्चा करत असताना, विनायक कधी मतप्रदर्शन करीत नाही. (खरंतर मीपण खूप वेळा चूप बसण्याचा प्रयत्न करतो पण अंगातले किटाणू ऐकत नाहीत.)
अभ्यासात हुशार मुलांच्या कारकिर्दीचा जसा टिपिकल आलेख असतो तेच विनायकाच्या बाबतीत आहे. दहावीनंतर आपल्या ग्रुपवरील प्रसिद्ध रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण. सॊमय्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी. त्यानंतर सिमेन्स ह्या नामवंत कंपनीत नोकरी. नोकरीसंदर्भात भारतभ्रमण. नोकरी सुरु असतानाच कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.(कस जमत कोणास ठाऊक? मला तर शाळेतल्या परीक्षांचापण कंटाळा यायचा )
साहजिकच त्यानंतर परदेशगमन. युरोप, अमेरिका, ब्रिटन येथील आय.टी. क्षेत्रातील कंपनींमध्ये कामाचा अनुभव. इंग्रजांच्या देशात असताना कंपनीतर्फे क्रिकेटचा आनंद लुटला. काही कपही जिंकले. (कदाचित इंग्लडमधले कोणीतरी गोरा त्याला म्हणाला असावा, टुमको डुगणा लगान देना पडेगा ) काही वर्षांनंतर मायदेशाच्या ओढीने भारतात परत आला. सध्या भारतात फ्रेंच कंपनीसाठी कार्यरत आहे.
विनायकाचा मुलगा तन्मय एम. एस. पूर्ण करून अमेरिकेत सिएटेल येथे नोकरी करत आहे. विनायकची लेक तेजल शास्त्रीय नृत्यात पारंगत आहे आणि सहचारिणी रेखावहिनी तर नृत्यविशारद आहेत. आपल्या विनायकच्या नृत्याबाबत म्हणाल तर आपण फारफार तर त्याला नृत्यविदारक म्हणू शकतो. 😍 असो!
विनायक, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
प्रदीप4 years ago
प्रसाद4 years ago
संजय डी.4 years ago
प्रशांत4 years ago
राजश्री4 years ago
संजय के.4 years ago
नरेश4 years ago
अनिल4 years ago
महेश4 years ago
अभिजित4 years ago
समीर4 years ago
विलास के.4 years ago
प्रकाश4 years ago
दिगंबर4 years ago
नेत्रा4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा