"इथे पण कन्या शाळेची भिंत मधे ठेवाच तुम्ही!" नेत्राने गंमतीने दिलेल्या ह्या सल्ल्यानंतर काल पुन्हा एकदा मन त्या भिंतीवर रेंगाळलं. शाळेतला तो प्रार्थनेचा वर्ग आणि तिथून होणारं कन्याशाळेचं दर्शन. आता सगळं इतिहासजमा झालयं. माझी स्मरणशक्ती चांगली असूनदेखील कोण खिडकीपाशी बसायचं आणि कोण कोणाला बघायचं? तेही आठवत नाहीयं. 😁
जरी आपली मधली सुट्टी हा मुला-मुलींचा एकत्र ग्रुप असला तरी कन्याशाळेची एक अदृश्य भिंत आहेच. शाळेत असतानादेखील एकमेकांचा स्वभाव आपल्याला फारसा माहित नव्हता, मग इतक्या वर्षांनंतर माहित पडणे अशक्यचं. त्यातूनच हे 'नेत्रा लेफ्ट' नाट्य घडलं. गोप्याने नाटकाचा पडदा द्यायच्या आधीच! 🤦🏻♂️ तरी मध्ये पोष्टरबॉय संजयने धोक्याची सुचना दिली होती, पण त्याचा इशारा फॉरवर्ड पोष्ट प्रमाणे दुर्लक्षिला गेला.
देशी-विदेशी मित्र देशाच्या इतिहासावर वादविवाद करत ग्रुपवर एकमेकांचं ज्ञान वाढवीत होते, त्याचबरोबर दुसरीकडे काहीजण बोअर होत होते. आता आपण बोअर व्हायचं का इतरांना बोअर करायचं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. एखादी गोष्ट कोणाला बोअर वाटू शकते, तर कोणाला इंटरेस्टिंग. कारण आपण भावनाप्रधान माणूस आहोत रोबोट नाही, एकसारखे असायला! 🤖🤖🤖
परंतु कालच्या घटनेत गैरसमज कसे होतात आणि ते कसे दूर करावेत याचा उत्तम धडा मिळाला. नेत्राने मस्करीत भिंत बांधायचा सल्ला दिला पण शैकाने तो गंभीरपणे घेतला आणि वातावरण गरम झालं. अगदी संत मुक्ताईंचा उपदेशसुद्धा कामी आला नाही. नेत्रा लेफ्ट झाली. (डाव्यांच्या संख्येत अजून एक भर) इथपर्यन्तच्या घटना स्वाभाविक होत्या.
त्यानंतर मात्र शैलेश आणि नेत्राने वागण्यात जी परिपक्वता (maturity) दाखवली ती निव्वळ प्रशंसनीय ! दोघांनीही थोडासुद्धा इगो न बाळगता नाटकावर पडदा पाडला. लेफ्ट झालेली नेत्रा राइट झाली 🙂 ग्रुपमध्ये असं काही घडतं तेव्हा इगो बाजूला ठेवणं सोप्प नसतं. (निदान मला तरी एवढ्या सहजी जमलं नसतं) इतरांनीदेखील वातावरण निवळण्यासाठी चांगले प्रयत्न केले. धन्यवाद !!! 🙏
गीता4 years ago
नेत्रा4 years ago
प्रदीप4 years ago
संजय डी.4 years ago
सुनील4 years ago
विनायक4 years ago
गणेश4 years ago
वैशाली4 years ago
समीर4 years ago
नीना4 years ago
प्रशांत4 years ago
विलास के.4 years ago
राजश्री4 years ago
अभिजित4 years ago
दयानंद4 years ago
वर्षा एस.4 years ago
विनोद4 years ago
संतोष एम.4 years ago
प्रसाद4 years ago
वर्षा डब्ल्यू.4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा