मधली सुट्टी संस्थापक, सावंतकुलोत्पन्न, मुलुंडनिवासी, रविदत्त. बिरुदावली खूपच लांबली ना? आज वाढदिवस आहे ना म्हणून! बाकी आमचे रविभाई.
एक मधली सुट्टी आम्हाला शाळेने दिली आणि दुसरी मधली सुट्टी रवीने दिली व्हाट्सएप ग्रुपच्या रूपाने. जरा उशीरचं झाला स्थापनेला. पण असो! 'आयुष्य ही शाळा' म्हटलं तर 'मधली सुट्टी' पाहिजेच. रविदत्त सध्या पोलिसदलात उच्चपदावर कार्यरत आहे. रवीबद्दल, शाळेत असताना जर कोणी सांगितलं असत हा पोलिसदलात जाणार आहे तर मी विश्वासच ठेवला नसता. गृहपाठ केला नाही किंवा वर्गात काही मस्ती केल्यावर शिक्षकांच्या माराच्या भीतीने रवीच्या चेहऱ्यावर निरागस पाडसाचे जे भाव येतं ते पाहिलेल्यांना हा सिंघम होईल असे वाटणे शक्यच नव्हते. 😊
शाळेत असताना मॉनिटर होऊन रवीने कधी वर्ग कंट्रोल केल्याचे आठवत नाही, पण तोच रवी मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडत आहे. हॅट्स ऑफ टू रवी (म्हणजे मराठीत टोप्या आणि फेटे उडवा!)
आपल्या दोन्ही व्हाट्सएप ग्रुपमध्ये रवीचा मुक्त संचार असतो. त्याची स्वतःची जी काही मत असतील ती व्यक्त करतो. चूक झाल्यास प्रांजळपणे कबूल करतो. लेफ्ट राइट कवायत करता करता एक-दोनदा ग्रुपमधुनच लेफ्ट झाला होता.
रविदत्त बऱ्याचदा अभ्यासपूर्ण मतं व्यक्त करतो. म्हणजे शाळेत असताना रवी अभ्यासात खूप हुशार होता असही नाही. आमच्यासारखाचं सामान्य हुशार! बहुधा मुलुंड परिसरात राहणाऱ्या वर्गातील बुद्धिमान शाळूसोबतींमुळे तो जास्त हुशार झाला असावा 😊. सद्या मुलुंडनिवासी असला तरी रवीला कधी फोन केला कि जाणवत त्याच्या मनात काळाचौकी अजूनही घट्ट जागा पकडून आहे.
एका वाक्यात रविदत्तबद्दल सांगायचं तर खाकी रंगामागे असलेला गुलाबी रंग! 😍
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुला निरामय आनंदी आयुष्य लाभो हीच श्रीदत्तचरणी प्रार्थना !!!
तुमची प्रतिक्रिया लिहा