शाळेत असताना अबोल, शांत असा विद्यार्थी. प्रदीप आणि सुनील एकाच इमारतीतील रहिवाशी. माझं बऱ्याचदा सुनीलकडे जाणं होई. पण प्रदीप कधी त्यांच्या इमारतीच्या मैदानात किंवा ग्रुपमध्ये दिसायचा नाही (आणि सुनील घरी सापडायचा नाही 😃)
शाळेनंतरचा प्रदीप मात्र एकदम वेगळा. त्याने एम. डी. कॉलेजमधून बी .एससी. पूर्ण केले. त्या दरम्यान शालेय जीवनातील कसर भरून काढत कॉलेजमध्ये होमगार्ड, हॉलिबॉल, इ. ऍक्टिव्हिटीज मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. एम. एससी. करतानाच कॉलेज राजकारणात प्रवेश केला आणि कॉलेज सी.आर. म्हणून निवडून आला. परंतु राजकारण हा आपला पिंड नाही हे कळायला थोडा उशीर झाला... त्या नादात एम. एससी. अर्धवटच राहिले. मग सरळ नोकरी पत्करली.
मार्केट रिसर्च क्षेत्रातील एक तपाच्या नोकरीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी मुंबापुरीला रामराम ठोकून साताऱ्यातील कराड येथे स्थलांतर केले. टी.व्ही. चॅनेल डिस्ट्रिब्युशनच्या व्यवसायात जम बसवला. सोनी, स्टार स्पोर्ट्स, टेन स्पोर्ट्स. इ. नामवंत कंपनींसोबत काम करण्याची संधी लाभली. व्यवसाय निमित्ताने कोकण, गोवा, नाशिक तसेच क्वचित परदेशभ्रमणही झाले.
कराडमध्ये व्यवसायासोबत पर्यावरण मित्र, शांतता कमिटी, शिवम प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थासोबत जोडला गेला. त्या अनुषंगाने प्राचार्य शिवाजीराव भोसले, राजीव दीक्षित, पोपटराव पवार, भैय्यू महाराज, विश्वास नांगरे पाटील यांसारख्या प्रभावशाली व्यक्तिमत्वांना जवळून पाहता आलं. प्रदीपने दासबोध, मनोबोध अध्ययन ह्या द्वारे अध्यात्मदेखील अनुभवलं. (अध्यात्मिक ज्ञान हे आपल्या व्हाट्सअप ग्रुपवरसुद्धा मिळू शकते हे त्याला हल्लीच समजलं 😍)
कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या 'प्रीतिसंगमावर' वसलेल्या कराड येथे प्रदीपचे कष्ट सार्थकी लागले असे म्हणायला हरकत नाही. कराडमधील जवळपास १८ वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर प्रदीप सध्या कुटुंबासोबत नवी मुंबईत स्थायिक झाला आहे.
अनिल3 years ago
दयानंद3 years ago
अभिजीत3 years ago
विलास के3 years ago
विनायक3 years ago
गीता3 years ago
संजय के3 years ago
समीर3 years ago
सुनील3 years ago
राजश्री3 years ago
अनिता3 years ago
गणेश3 years ago
नेत्रा3 years ago
प्रदीप3 years ago
प्रसाद3 years ago
महेश3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा