आमच्या पुणेकर मित्राने आज चक्क शुभेच्छा दिल्या आहेत! (पुणेकर साधरणतः सल्ला देतात. 😉) म्हणून त्यांच्या शुभेच्छांचा ऊतराई होण्यासाठी शुभेच्छांवरच ऊतारा देतो. नाहीतर पुणेरी पाटी लावतील,
येथे फुकटच्या शुभेच्छा मिळणार नाहीत.😀
गंमतीचा भाग सोडा, पण पुणेकरांनी शुभेच्छा दिल्या आहेत म्हणजे त्या मनापासूनच असणार, पुणेकरांचा सगळं कस मनापासून असत (अगदी शिव्यासुद्धा ).
आपण शुभेच्छांवरच बोलू काही ! कारण व्हाट्सअप मुळे शुभेच्छांचे विषय आणि शुभेच्छांची संख्या यांना काही तोटा नाही. आता कस सगळं online असल्याने शुभेच्छा forwrad करण खुपच सोप्पं झालय. अगदी शुभेच्छा हा शब्द मराठीत लिहायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात post forward होते.
सोशल मिडियाचा उदय होण्यापूर्वी एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपल्याला थोडी मेहनत करावी लागत असे. आठवून बघा एखाद्या मित्र/मैत्रिणीला शुभेच्छाकार्ड पाठवायच असेल तर किती सायास करावे लागत होते. चांगल आणि बजेटमध्ये बसेल अस शुभेच्छाकार्ड शोधणे, त्यावरचा मजकूर शोधणे, प्रत्यक्ष भेटून कार्ड देणार नसाल तर postal adress किंवा एखाद कबूतर (म्हणजे जवळचा मित्र/मैत्रिण) शोधणे. बर त्यात डिलीटचा पण ऑप्शन नाही. काही चुक झाली तर भोगा आपल्या कर्माची फळ. 😂 (म्हणून मला डिलीटचा ऑप्शन आवडतो).
अरेच्चा! विषय थोडा भरकटलाच. शुभेच्छांवरून शुभेच्छापत्रांवर गेला. कधीतरी कोणालातरी अत्तर लावून पाठवलेल्या Greetings Card ची सुगंधी आठवण झाली. (पुढे झाल काहिच नाही, अत्तर मात्र वाया गेल. 😢)
तर हल्ली एका वर्षात जेवढे दिवस नसतात त्यापेक्षा जास्त शुभेच्छांचे विषय असतात. जयंती, पुण्यतिथी, शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, गटारी अमावस्या अगदी सर्वपित्री अमावस्येच्या शुभेच्छासुद्धा येतात (सर्व पितर पण खुश) त्यात आपण सर्वधर्मसमभाववाले त्यामुळे पोंगल, बैसाखी, ईद, ख्रिसमस हे पण असतच किंबहुना ख्रिसमसचा आनंद ख्रिश्चन लोकांपेक्षा आपल्यालाच जास्त होतो. (थर्टी फर्स्ट ची चाहूल लागते ना 😊)
ते काहीही असो! शुभेच्छा कसल्या का असेनात पाठवत रहा. फक्त ज्याला शुभेच्छा पाठवताय त्यांच्याबद्दल मनात शुभ इच्छा ठेवा म्हणजे झाल! 😍
वरिल लेख वाचण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
अभय5 years ago
संजय डी.5 years ago
महेश5 years ago
संजय के.5 years ago
विलास के.5 years ago
प्रसाद5 years ago
किर्ती5 years ago
प्रकाश5 years ago
दयानंद5 years ago
गणेश5 years ago
समीर5 years ago
प्रशांत5 years ago
सुनील5 years ago
गीता5 years ago
राजश्री5 years ago
दिलीप5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा