हा श्लोक आपण शालेय जीवनात अनेकदा ऐकतो. शाळेत असेपर्यंत शाळेतील शिक्षक म्हणजेच गुरू अशी आपली धारणा असते. फारफार तर महाभारतातले गुरू द्रोणाचार्य आणि कृपाचार्य... महाभारताचे रचनाकार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ शद्ध पौर्णिमेला झाला अशी मान्यता आहे. हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आम्ही लहान असताना शाळेव्यतिरिक्त गुरूपौर्णिमा फारशी साजरीही होत नसे. (काही भक्तीपंथ वगळता)
हल्ली समाजमाध्यमांमुळे आपल्याला सगळे सणवार, तिथी, अमावास्या, पौर्णिमा लगेच कळतात. आपणही वेळात वेळ काढून ऑनलाइन साजरे करतो. (मेसेजेस तर फॉरवर्ड करायचे असतात) कधी समाजरेट्यामुळे तर कधी मनापासून...
शिष्याने गुरूचा यथोचित सन्मान नेहमी करावा. परंतु गुरुपौर्णिमा हा ज्ञात-अज्ञात गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस. आत्ता एकदम सोप्प झालंय! हॅपी गुरुपौर्णिमा असा स्टेटस ठेवला कि काम झालं. बहुतेक गुरु आणि शिष्य दोघेही सोशल मीडियावर असतात. गुरूदक्षिणा देण्याघेण्याचे दिवस केव्हाचं इतिहासजमा झालेयतं.(काही सन्माननीय अपवाद वगळता) हल्ली चेलेच गुरूंना शिकवताना दिसतात 😎
सोशल मिडियामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या असंख्य लहान-थोर गुरुंची महती कळते. सोशल मिडिया म्हणजे फक्त थिल्लरपणा नाही. तोही एक गुरू आहे, त्याच्यासाठी सर्व शिष्य समान आहेत. सोशल मिडियावर आपल्यासाठी काय चांगल? काय वाईट? हे आपण स्वत: ठरवावं. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार! (सद्गुरू श्री. वामनराव पै यांचा संदेश 🙏)
अवघड परिस्थिती किंवा कठिण काळ हा माणसाचा अदृश्य गुरू असतो. त्या काळात आपण जे शिकतो ते अमूल्य असतं... म्हणजे त्यापासून तुम्ही काही शिकलातं तर! तिथे तुमचे मूल्यमापन करायला तोंडी किंवा लेखी परीक्षा नसते. असो!
तू माका काय शिकवतलसं? ह्या नैसर्गिक स्वभावविशेषामुळे संतूवाण्याला फारच कमी गुरू लाभलेयत 😝. त्या सर्व गुरुंना साष्टांग दंडवत!
विजय3 years ago
विलास के.3 years ago
चारू 3 years ago
निलेश3 years ago
सुशांत3 years ago
शैका3 years ago
विकास सी.3 years ago
सीमा3 years ago
नरेश3 years ago
सायमन3 years ago
दीपक3 years ago
तृप्ती3 years ago
समीर3 years ago
अनिता3 years ago
विनायक एस.3 years ago
प्रभा3 years ago
सिद्देश3 years ago
उदय3 years ago
रविदत्त3 years ago
सुमित3 years ago
दयानंद3 years ago
मनीषा3 years ago
प्रकाश3 years ago
संजय के.3 years ago
अमित3 years ago
रोहित 3 years ago
शेखर3 years ago
जगदीश3 years ago
अजित3 years ago
वंदना3 years ago
वर्षा3 years ago
गणेश 3 years ago
अभिजित4 years ago
गीता4 years ago
राजश्री4 years ago
वर्षा डब्ल्यू.4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा