३१ ऑक्टोबर २०२१

सुगंधी उटणं - एक प्रवास (पुणे ते लंडन व्हाया नवी मुंबई)

पुणेरी मित्र संजय धुमाळने दिवाळीनिमित्त आपल्या ग्रुपसाठी सुरु केलेली उटणं-भेट ही सुगंधी प्रथा ह्यावर्षी थेट सातासमुद्रापार पोहचली. नवी-मुंबईच्या विकासा मुळे हे शक्य झाले. अजून किती विकास हवाय?😃

ज्या विलासच्या प्रभुलीला आपण ग्रुपवर पाहत असतो, त्या प्रभूलादेखील आतापर्यंत हे उटणं अप्राप्य होतं. विलायतेतील विलास पी. दरवर्षी दिवाळीत आपल्या उटणे-भेटीचे किस्से ऐकत असे किंवा फोटो पाहत असे. ह्या दिवाळीत त्यालाही सुंगधी स्नानाचे भाग्य लाभेल (धन्यवाद विकास!)👍

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ह्या प्रथेत प्रत्यक्ष सहभागी होता आल्याने प्रभूचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल. त्या आनंदाची प्रतिक्रियाही मोठीच असणार. माझ्या अविश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विलासने लंडनमध्ये सार्वजनिक अभ्यंगस्नानाचा भव्य सोहळा आयोजित केला आहे.😍

मला तर चक्क नजरेसमोर चित्र दिसतंय. दिवाळी पहाटेला हातात बादली, सुगंधी उटणं, कारीटं घेऊन लंडनच्या सार्वजनिक नळावर चाललेला विलास.सुगंधी उटणं लावून नळाखाली बसलेला विलास आणि उटण्याच्या सुगंधाने तिथे पोहचलेला लंडनचा पोलीस बॉबी. आजूबाजूला जमलेली थोडीशी विदेशी बघ्यांची गर्दी. पण कारीटं म्हणजे मिनिबॉम्ब असावा ह्या भीतीने कोणी पुढे येण्याची डेअरिंग करत नाहीयं. कुजबुज वाढतेय... त्याच गर्दीतुन मालवणचा बाबी सावंत पुढे येतो आणि बॉबीला विंग्रजीत समजावतो.

"मांयझया, बॉम्बबिम्ब काय नाय हां. ह्येचा अभ्यंगस्नान झाला की तो पायाच्या आंगठ्यानं कारीटं फोडतलो, गोविंदा गोपाळा ! करतलो आणि घराक जातलो. Happy Diwali"🏮

नळटीप: लंडनमध्ये सार्वजनिक नळ नसल्यास आमदार निधीतून त्वरित बांधून देण्यात येतील. 😍
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

निकेता4 years ago

संतु वाणी as usual एकदम मस्त

विलास पी.4 years ago

🙂 वाचवून ठेवलंय थोडं गेल्या वर्षीच...

दयानंद4 years ago

😍👌👌👌👌😘

मनीषा बी.4 years ago

सुगंधी उटण्याचा लंडन प्रवास मस्त 👌🏻👌🏻
Read more in this section:
वर्गशिक्षक: दहावी-अपी.टी. चा तासआठवणीतील बोंबाबोंब५० मार्कांचं संस्कृतगुगलचे मीठ अळणी७ वा वर्धापनदिनबॉईज ओन्ली - चर्चासत्रप्रसादचे पेनबंधमधली सुट्टीसुगंधी उटणंश्रावणातील स्नेहसंमेलनकन्याशाळेची भिंतस्नेहसंमेलन २०२१@ मुलुंड पोलीस स्टेशनमुलुंड ते काळाचौकीएक मुलाखत - गटप्रमुखांचीसुगंधी उटणं - एक प्रवासपन्नाशी पारची ऊर्जावृंदावन सोहळा
Close Video ❌
Share