आटपाटनगर लोकशाही (शाई)तील व्यक्तीस्वातंत्र्याचे फायदे! 😇
गल्लीतल्या क्रिकेट टिममध्येसुद्दा ज्याला निवडले जात नाही तो बॅटसमन, विराट कोहलीला बॅटिंग कशी करायची ते सांगू शकतो. 🏏
ज्याचा भाजीपाल्याशी संबंध फक्त नाक्यावरच्या मार्केटपुरताच असतो तो, शेतकऱ्यांना कोणत पीक काढावं ते सांगू शकतो.
जिला स्वत:ला साडीच्या नीऱ्या नीट काढता येत नाही ती, माधुरी दीक्षितला साडी कशी नेसावी याच्या टिप्स देऊ शकते. 🙆♂
युट्यूबवर वरणाची रेसिपी बघून जी वरण बनवते ती, मास्टर शेफ संजीव कपूरच्या रेसिपी मध्ये काय कमी आहे ते सांगू शकते. 🍛
स्वत:चे वाहन पार्क करताना ज्याची फे फे ऊडते तो, विक्रम लॅंडर चे लॅंडिंग कसे करायला पाहिजे होते त्याचे मार्गदर्शन करू शकतो. 🚀
ज्या कुटुंबमालकाला स्वतःचे घर नीट चालवता येत नाही तो देशाच्या पंतप्रधानांना देश कसा चालवावा ते सांगू शकतो.😝
स्वगॄहि ज्या पतीचे पत्नीच्या सल्ल्याशिवाय पानही हलत नाही तो राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतो.😝
तुमची प्रतिक्रिया लिहा