१८ ऑगष्ट २०१८

श्रावणातील स्नेहसंमेलन - , वांगणी

संदर्भ: आमचे शाळेतल्या मित्रांचे स्नेहसंमेलन वांगणी येथे आयोजित करण्यात होते. तेही चक्क श्रावण महिन्यात! त्या स्नेह-संमेलनाचा वृत्तांत.
<>

सालाबादप्रमाणे ह्यावर्षीचे स्नेह-संमेलन साजरे झाले. काहीजण प्रत्यक्ष तर काहीजण मनाने आपल्या सोबत होते. आपला आद्य ऍडमीन सुनील याच्याप्रती स्नेह व्यक्त करण्यासाठी त्याच्या वाढदिवसाच्या आसपास एकत्र जमावे अशी कल्पना आली आणि गुरूवार, शुक्रवार असे मधलेचं विनासुट्टीचे दिवस पकडून कार्यक्रमाची आखणी झाली. तरीही सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही अपरिहार्य कारणांमुळे काही मित्र ऊपस्थित राहू शकले नाहीत. महेश सरांनी वांगणी येथे स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते.

गुरुवारी सकाळी ज्यांना स्वतःच्या घरी जेवण नव्हते 😜 त्यांनी इथे येऊन Captain Cook यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: स्वयंपाक बनविला व भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच संध्याकाळी येणाऱ्या मित्रांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करून ठेवली. 🍛 🍲 🎂 🍷

बरेच जण आगगाडीचा त्रासदायक प्रवास करून पोहचले. संतोष एम. हे स्वतःच्या आगगाडीने काळाचौकीच्या गँग सोबत पोहोचले. नेहमीप्रमाणे पुणेकर , सातारकर वेळेत आले. परशुराम तर सिनेमातील पाहूणा कलाकार असतो तसा थोड्यावेळासाठी आला. पण आला हे महत्त्वाचं. फक्त मित्रांसोबत चहा पिण्यासाठी इथपर्यंत आला. म्हणजे बघा काय मैत्रीची जादू आहे! दर वेळेला तेच शाळासोबती भेटतात पण प्रत्येक भेटीचा आनंद वेगळा असतो.

अभयने नेहमीप्रमाणे 🎤 कॅराओके संगीत संध्याचे आयोजन केले होते. तसं बरेच मित्र सुसह्य गातात, पण प्रसाद, अवधूत, महेश, प्रशांत, शैलैश जरा वरचा क्लास. एकदम माहौल बनवून टाकतात. प्रसाद तर पीता-पीता गातो. बेट्याला आवाजाची दैवी देणगी आहे. गाताना पण अनेक गमतीजमती होतात. 😆 कॅराओकेची गुणपद्धती चुकीची असल्याने, ह्यावर्षी अवधूतला सर्वात जास्त गुण मिळाले (गेल्यावेळचे सर्वाधिक गुणधारक महेशसर) असो! तर आपण ते जास्त मनावर घ्यायच नाही. कोण किती चांगल गातो आपल्याला माहित आहे.😆 गुणांपेक्षा मनोरंजन महत्त्वाचे.

'ओ साथी रे तेरे बिनाभी क्या जीना ' ह्या गाण्यावर सुरेशदादांच्या डोळ्यातून पाणी काढणे, असं आव्हान गायकांना देण्यात आल होतं. पण ही कलाकारी काही कुठल्याच गायकाला जमली नाही. 😂 प्रत्येक जण आपापल्यापरीने आनंद घेत होता. काही गात होते, काही पीत होते, काही पिसत होते.

मधल्या काळात गणेश रात्री घरी जाण्यस निघाला, त्याला विलासने स्टेशनवर नेऊन सोडलं आणि स्टेशनवर वाट बघत असलेल्या माधवाला बंगल्यावर आणलं . म्हणजे एक नग गेला आणि बदली दुसरा नग आला (नंतर नृत्याच्या कार्यक्रमात कळलं माधव नग नसून नाचणारा नाग आहे. 🐍) ह्यावेळच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भोजन, अल्पोहार बनवण्याची जबाबदारी Captain Cook यांच्यासोबत सर्व मित्रांनी घेतली होती. सर्वांनी स्वतःची भांडी स्वतः च धुतली, Non-Veg वाल्यांनी तर स्वतः चे चिकनसुद्धा 🐓 स्वतःचं धुतले. मला आणि विनायकला सकाळी लवकर परतायचे असल्याने आम्ही लवकर झोपी गेलो. सकाळी उठल्यावर कळले रात्री वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. But it's OK. यारी-दोस्तीमें ये तो चलते राहता है.

शुक्रवारी सकाळी काहीजण घरी गेले आणि काही जण घरी जाण्याच्या बेतात असतानाचं आमचे मित्र इन्स्पेक्टर सुशिल यांनी एंट्री घेतली. अगदी हिंदी सिनेमातील पोलिसांसारखी सगळं झाल्यावर! मग बंगला बंद करण्याची कारवाई त्यांच्या हस्ते पार पाडली. अशा रीतीने अजून एका स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली.

श्रावणातील रावण:अनिल, अभय , अनंत पालव, अवधूत, दयानंद, दीपक, दिलीप, गणेश, महेश, नितीन, परशुराम, प्रदीप, प्रसाद, प्रशांत, राजेश, संजय डी, संजय के, संतोष, शैलेश, सुनील, सुरेश, सुशील, विकास, विलास, विनय, विनायक आणि मी
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

✍️ तुमची प्रतिक्रिया लिहा

Read more in this section:
वर्गशिक्षक: दहावी-अपी.टी. चा तासआठवणीतील बोंबाबोंब५० मार्कांचं संस्कृतगुगलचे मीठ अळणी७ वा वर्धापनदिनबॉईज ओन्ली - चर्चासत्रप्रसादचे पेनबंधमधली सुट्टीसुगंधी उटणंश्रावणातील स्नेहसंमेलनकन्याशाळेची भिंतस्नेहसंमेलन २०२१@ मुलुंड पोलीस स्टेशनमुलुंड ते काळाचौकी
Close Video ❌