👆शाळेच्या फळ्यावर हा सुविचार आम्ही वाचत असू. पण आमच्या वर्गात एक विवेकानंद ऑलरेडी असल्याने आम्ही कधी दुसरा विवेकानंद बनण्याचा प्रयत्न केला नाही. (तसही ज्ञान वाढवण्यापेक्षा केस वाढवणं सोप्प 😃)
आमच्या शाळेतील जवळपास सर्वच शिक्षक विवेकला ओळखत होते. शिवाजी विद्यालय मधील एक प्रसिद्ध, चुणचुणीत विद्यार्थी! 👏 वक्तृत्व, पाठांतर , गीत-गायन अशा स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य. आवाज असा की माईकची गरजच नाही. आणि हो अभिनयक्षेत्र विसरलो. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक नाटकात विवेक असायचा. उत्तम क्रिकेटपटू. दहावीनंतरही त्याकाळी आमच्या विभागातील टेनिस क्रिकेट जगतात विवेकच बऱ्यापैकी नाव होत. सध्या वयोमानानुसार स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेली असावी. परंतु वजनदार व्यक्तिमत्त्व आणि खणखणीत आवाज अजूनही कायम.👍
ग्रुपवर जास्त सक्रिय नसतो पण चालू घडामोडींवर लक्ष ठेऊन असतो. त्याला वेळ मिळेल तेव्हा उगवतो. Vivek Typing ... हा सिग्नल दिसला कि सगळे सावध होतात. कधी कधी गैरसमजातून सभात्याग करतो. पण नंतर आढेवेढे न घेता पुनरागमन करतो. हिच तर आपली मैत्री आहे. कधी गोड, कधी तिखट (तर कधी आंबट 😘)
विवेक नोकरीनिमित्त बऱ्याचदा पुणेवारी करतो, त्यामुळे कधी कधी त्याच्या बोलण्यात पुणेरी झाक जाणवते. अजूनही काळाचौकी परिसरात राहत असल्याने आमच्या गटाचा हक्काचा मेंबर. एका फोनवर हजर. ऑनलाईन विवेक आणि ऑफलाईन विवेक हि दोन वेगळी व्यक्तिमत्व आहेत, हे त्याला प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवतं. भेटू लवकरच! 👍
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
विलास के2 years ago
अनिल2 years ago
विवेक2 years ago
किसन2 years ago
संजय के2 years ago
वर्षा2 years ago
वैशाली2 years ago
विनय2 years ago
सुनील2 years ago
गणेश2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा