Sunil Bhosale

सुनील, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!! 💐

💐 जगन्मित्र सुनील - माझ्यासाठी नवनीत मार्गदर्शक.

सुनीलबद्दल काय लिहावे? माझ्याइतकं तुम्हीदेखील त्याला ओळखता. वामनमूर्ती दिगंत कीर्ती असं व्यक्तिमत्व. मित्रांच्या हाकेला कधीहि धावून जाणारा. शाळेत असताना तर मी हाक न मारताही आमच्या बिल्डींगसमोर हजर असायचा सायकल घेऊन 🚲

मनमोकळ्या आणि सरळमार्गी स्वभावामुळे बराच मोठा मित्रपरिवार बाळगून असणारा, त्यातही वय आणि क्षेत्राची बंधन नाहीत. पान टपरीपासून टॉवरपर्यंत विखुरलेला गोतावळा.

सुनीलची आणि माझी मैत्री इयत्ता पाचवीपासून (म्हणजे गंमतीने म्हणायच तर पाचवीला पूजलेली मैत्री म्हणजे आयुष्यभर टिकणार). पाचवी ते सातवी माझी मधली सुट्टी सुनीलच्या घरी असायची. सुनीलच्या घरी त्याचे जेवढे लाड होत तेवढेच माझेही होत, मधल्या सुट्टीत छान छान खाऊ मिळत असे. मला वाटतं त्या वयात मैत्री होण्यासाठी तेवढंस कारणही पुरेस होतं. पण मैत्री वृद्धिंगत होण्यासाठी काही समान दुवे आवश्यक असतात. अभ्यासाचा कंटाळा आणि कॅरम हे आमच्यातील समान दुवे.

अर्थात कॅरमचा किडा मला सुनीलमुळेच चावला. शाळा-कॉलेजच्या वयात कॅरमच्या नादापायी दोघांनी कुठले कुठले गल्लीबोळ पालथे घातले होते. सुनील काही वर्ष रुपारेल कॉलेजचा कॅरम चॅम्पियनही होता (मी आमच्या बिल्डिंगचा 😝)

आजही कधीतरी आम्ही एखाद्या कॅरमस्पर्धेच्या हॉलमध्ये एकमेकांना अचानकपणे प्रेक्षक म्हणून भेटतो. (जसे काही मित्र अनपेक्षितरित्या मदिरालयात भेटतात 😳)

पुलंनी मैत्रीची एक सोपी व्याख्या केली आहे , "रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री" ह्या व्याख्येत चपखल बसणारी आमची मैत्री.👍

सुनील मित्रा, वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि स्वभावाप्रमाणे एक शंका मराठीत सुनील लिहताना नी र्हस्व की दीर्घ लिहायचा? 😉

२५ जुलै २०२०
- संतूवाणी

शुभेच्छा पत्रं

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

दयानंद3 years ago

खुप छान लिहिलं, नेहमी प्रमाणेच वाचून खूप आनंद झाला

महेश5 years ago

सुनील ✅
मराठी शुद्ध लेखन नियम ६:
६.१ मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल, तरच त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार र्‍हस्व लिहावा.

वसंत5 years ago

खूप खूप सुंदर संतुवाणी

संजय डी.5 years ago

पुलंनी मैत्रीची व्याख्या अगदी यथार्थ केली आहे.मित्र या शब्दाची आमची व्याख्या सुनील या एका नावातच पुर्ण होते. उपमेयामुळे उपमांचे अलंकार अलंकृत होणारे दृष्टीसमोरील एकमेव असे हे व्यक्तीमत्व. नावातला नी ऱ्हस्व असता अथवा दीर्घ, त्यामुळे चांगुलपणाला काही बाधा आली असती असे आम्हाला तीळमात्र वाटत नाही.👍

समीर5 years ago

👍🏻👌🏻हृदयातला कप्पा खासमखास💐

रविदत्त5 years ago

ये दोस्ती हम नही तोडेंगे
तोडेंगे दम मगर साथना छोडेंगे
मैत्री अख्यान वाचताना मनात बँकग्राऊंडला विरु च गाण वाजत होत.लिखाण इतक सुरेख आहे कि तुम्ही बालवय,किशोर,काँलेजकुमार आणी प्रोढावस्थेत वेगवेगळया किश्शांन प्रसंगी जोडगळी डोळ्या समोर तरळून गेली. 😀👌👌
....संतोषा तुझ्या रसकशीनेच मदिरालय बंद पडलीयत कि काय अस वाटून राहयलयय 😀 कुठून हि विषय ओढून मदिरालयाचा उल्लेख असतोच🍻

अवधूत5 years ago

1नंबर शुभेच्छा 👌🏻👌🏻👌🏻

राजश्री5 years ago

मस्तच👌 आवडता खाऊ जपून शेवटी ठेऊन खातात. त्याप्रमाणे वेळ काढून निवांत वाचन करावसं वाटतं. म्हणून प्रतिक्रिया उशिरा. आणि तशाच पण उपमा आणि विशेषण संपलीत माझ्याकडची. मैत्रीसाठी ची आणि तुझ्या लिखाणासाठी सुद्धा

गणेश5 years ago

संतोष, मनापासून लिहिलं आहेस.. 👌... मलाही शंका होती की सुनील वा सुनिल... मला वाटते सुनिल बरोबर आहे.... म्हणजे शाळेत तो तसे लिहायचा..

विनायक5 years ago

वाह संतोष वाह. आदर्श दोस्ती

प्रकाश5 years ago

संतोष काय म्हणतोस...मस्तच.. सर्वांच्या भावना उद्धृत केल्यास...👌🏻👌🏻

संजय के.5 years ago

मस्तच संतू 👌👌आपल्या सर्वांचाच लाडका मित्र आहे सुनील.

नरेश5 years ago

👌👌सुंदर

दयानंद5 years ago

खूपच भारी शुभेच्छा.....

विकास सी.5 years ago

मस्तच!!!!!

अभय5 years ago

Santosh, Jabardast !! As usual !!!

शैलेश के.5 years ago

अतिशय सुंदर आणि समप॔क 👌👌👌

अभिजित5 years ago

बेष्ट 👍👍👍

विनय5 years ago

👌👏

प्रदीप5 years ago

👌👌✅

नेत्रा5 years ago

सुंदर 👌👍

अनिल5 years ago

Ek number

दिलीप5 years ago

👌👌

दिगंबर5 years ago

👌🏻

संतोष एम.5 years ago

👌🏻👌🏻👌🏻

प्रसाद5 years ago

👌🏼👌🏼👌🏼

प्रशांत5 years ago

👌👌👍👍

विलास के.5 years ago

👌😘😘😘👏
Read more in this section:
Close Video ❌
Share