कुठे मुलाखतीला गेला तर कसं स्टाईलमध्ये सांगण्यासारखं नाव ! आपला विजय शिक्षणाने स्थापत्य अभियंता आणि पेशाने सिविल इंजिनिअर. रेती-सिमेंटच्या माल वर बारीक लक्ष ठेवून त्यातच रमणारा.
शाळेत असताना त्याची अशी काही खास बांधकामं नव्हती. एखाद्या अनधिकृत बांधकामासाठी शिक्षकांनी त्याला कधी समन्स बजावल्याचेही स्मरतं नाही. मर्यादित मस्ती आणि मर्यादित अभ्यास !
दहावीनंतर फटाफट इंजिनीअरिंग पूर्ण करून पठ्ठ्याने जवळजवळ बालवयातच विवाह केला. सिविल इंजिनिअर असल्याने प्रेमविवाहाचा जास्त स्कोप नव्हताच. आलेल्या निविदांमधून योग्य निविदा पास केली आणि आता सुखाने संसार करत आहे. मुलगा आय.टी. इंजिनीअरिंग करून नोकरीत स्थिरस्थावर आहे. गेल्या वर्षी लेकीचं लग्न करून दिलयं (पार्टी बाकी आहे बरं! ) यथावकाश आजोबाही होईल. (आम्ही अजूनही यंग अंकल आहोत)
विजयचे वास्तव्य अभ्युदयनगरातच असल्याने अधूनमधून आमची भेट होते. गणेशोत्सवात हमखास! अशा छोट्यामोठ्या भेटींमधून आपल्या मैत्रीची इमारत भक्कम होत जाते. मित्रा, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!! 💐
रविदत्त3 years ago
अनिल3 years ago
विनायक3 years ago
गीता3 years ago
विजय3 years ago
महेश3 years ago
नीना3 years ago
अभिजीत3 years ago
प्रसाद 3 years ago
संजय के3 years ago
प्रदीप3 years ago
सुनील3 years ago
राजश्री3 years ago
गणेश3 years ago
विनय3 years ago
नरेश 3 years ago
विलास के3 years ago
दिगंबर3 years ago
वसंत3 years ago
समीर3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा