दिगंबर जाधव उर्फ DJ आमचा तबलावादक मित्र. शाळेत असताना एखाद वाद्य वाजवता येणे म्हणजे अप्रुपचं होतं. कारण आत्तासारखे मध्यमवर्गीय पालक तेव्हा पाल्याबाबत एवढे जागरूक नव्हते. हल्ली बऱ्याच घरातून कोणता ना कोणता एक्स्ट्रा करीक्युलर कोर्स करणारा पाल्य आढळतो. आमच्यासाठी शाळेचा गृहपाठ हीच एक्स्ट्रा करीक्युलर एक्टिव्हिटी होती आणि इतर छंदांच्या बाबत आम्ही आत्मनिर्भर होतो.
आमच्या वर्गाला शाळेच्या समूह गीतगायन स्पर्धेत मिळणाऱ्या बक्षीसामागे दिगंबरच्या ढोलकीची थाप होती. कलाक्षेत्रात करीयर करणारा तो आमच्या वर्गातील बहुधा एकमेव. शाळेत असताना दिगंबर ऊत्तम क्रिकेटपटू होता. त्याकाळी मुंबईत काळाचौकीची जॉली क्रिकेट टिम खूप प्रसिद्ध होती, त्यांचा प्रमुख आधारस्तंभ गजा नावाचा खेळाडू होता, जो दिंगबरच्याच इमारतीत रहात असे. तर तेव्हा आपला दिगंबर त्याच्या बॅटिंग साठी छोटा गजा म्हणून ओळखला जायचा. स्वभावाने शांत आणि मितभाषी.
सध्या कलाक्षेत्रात कार्यरत आहे. जिथे आपण बऱ्याचदा व्यसनांमुळे वाया गेलेल्या टॅलेंटचे किस्से ऐकतो. मोहाचे क्षण पावलोपावली असणाऱ्या ह्या क्षेत्रात, अजूनही निर्व्यसनी असलेला हा आमचा तपस्वी. ढोलकी सोडून कुठलाच नाद केला नाही.
पारंपारिक तबला ते आधुनिक Octapad पर्यंत कोणतेही तालवाद्य लीलया वाजवणारा कलाकार. श्री. नारायण नायडूंसारखे ऊत्तम गुरू लाभल्याने त्याचासारखा उत्तम वादक घडला. आज देश-विदेशात वाद्यवृंदाचे कार्यक्रम करून कलाक्षेत्रातसुद्धा करीयर होऊ शकते हे सिद्ध केले. सुदैवाने त्याला श्रीधर फडके, कुमार सानू, बेला शेंडे, रविंद्र साठे, उत्तरा केळकर, अलका याज्ञिक, वैशाली सामंत, नितिन मुकेश, महेंद्र कपूर, अनिल मोहिले यांच्यासारख्या प्रथितयश कलाकारांना वाद्यसंगत करण्याची संधीसुद्धा लाभली.
तुझ्याकडून अशीच संगीतसेवा घडत रहावो व कधीतरी आम्हालाही तुझ्या वादनकलेचा आस्वाद घेण्याची संधी लाभो ही सदिच्छा!!!
विनायक5 years ago
रविदत्त5 years ago
महेश5 years ago
संजय डी.5 years ago
विलास पी.5 years ago
गीता5 years ago
प्रशांत5 years ago
सुनील5 years ago
प्रदीप5 years ago
विकास सी.5 years ago
संजय के.5 years ago
राजश्री5 years ago
विजय5 years ago
दीपक5 years ago
शैलेश डी.5 years ago
दयानंद5 years ago
अनिल5 years ago
अभय5 years ago
नेत्रा5 years ago
संतोष एम.5 years ago
प्रसाद5 years ago
गणेश5 years ago
प्रकाश5 years ago
समीर5 years ago
अभिजित5 years ago
नरेश5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा