१८ जुलै २०२१

इंग्रज मित्राची पिकनिक फ्रॉम होम

संदर्भ: ठरल्याप्रमाणे आमची पिकनिक तर झाली. मला काही जाता आला नाही. आमचा एक वर्गमित्र विलास प्रभू परदेशात राहतो अर्थात तोदेखील नाही जाऊ शकला. त्याला कधी कधी आम्ही प्रेमाने इंग्रज असे संबोधतो. त्याच्या नावावर खपवलेला हा कल्पना-विलास!

आज माझ्या भारतातल्या वर्गमित्रांनी गेट-टूगेदर आयोजित केले होते. मला प्रत्यक्ष उपस्थित रहायचे होते पण वेल्स ते वाडा अंतर थोडस जास्त असल्याने शक्य होणार नव्हतं. आणि मी फक्त आडनावाचा प्रभू आहे. त्यामुळे टीव्ही सिरियल्स मधल्या देवांप्रमाणे ढीssश्श.... करून इच्छीत स्थळी प्रकट होता येत नाही. मग मी ठरवलं पिकनिक फ्रॉम होम करायची. मित्रमैत्रिणी जी काय मजा तिकडे करतयात ती आपण घरबसल्या करू. मोबाईलमध्ये व्हाट्सअप सुरु केलं आणि बसलो वाट बघत पिकनिक ऍक्टिव्हिटीजची. सुरुवातीचे फोटो प्रवासाचे आले. मी पण खुर्चीत बसून कार चालवायची ऍक्टींग केली. (अर्थात माझ्याकडे कोणाचे लक्ष नाहीयं अस बघून)

पिकनिकच्या ठिकाणी पावसाळी वातावरण दिसत होतं. इंग्लडचा पाऊस क्वीनला ऐकत नाही तर मला काय ऐकणार? लॅपटॉपवरच पावसाची गाणी लावून वातावरणनिर्मिती केली. साधारण अकरा वाजेपर्यंत सगळे जमले. चमचमीत मिसळपावचा नाष्टा दिसत होता फोटोत. पण आज माझ्या नशिबी टोमॅटो सूप होतं. त्यानंतर काही मित्र मिनी रॅपलिंग करताना दिसले. आता आली का पंचाईत! पण माझ्या सुपीक डोक्यात एक आयडीया आली. बाल्कनीत आलो जिथे कपडे वाळवण्यासाठी नायलॉनची दोरी बांधलेली होती. अनायसे त्यावर एक टॉवेलपण होता. टॉवेलला पकडुन लटकणारच होतो इतक्यात सौ. बाल्कनीत आली. "काय करताय?" वेळीच पुढचे धोके माझ्या लक्षात आले. "काही नाही टॉवेल सुकला का पहात होतो." रॅपलिंगचा प्लॅन रद्द करून पुन्हा मोबाइलसमोर येऊन बसलॊ.

पुढच्या फोटोत काजू कतली खाताना दिसले काहीजण. This time I was lucky! फ्रीजमध्ये मुंबईहून नेलेली काजू कतली होती. पटकन एक तुकडा खाऊन घेतला. त्यानंतर पठ्ठे बैलगाडीतच बसले. तरीपण जिज्ञासा म्हणून उबर ला कॉल करून बुलक-कार्ट राईड अव्हेलेबल आहे का चॊकशी केली. उबरवाला आधीच त्रासलेला होता बहुधा. "व्हॉट नॉनसेन्स? डोन्ट कॉल अगेन." असं उत्तर मिळालं. पुढची ऍक्टिव्हिटी एकदम सोप्पी होती. गाणं बोलणे किंवा गाणे. माईक घेतला आणि 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' गायला सुरवात केली. सूर जरा जास्तच वरचा लागला असावा. पहिल्याच ओळीनंतर डोअरबेल वाजली. दरवाजा उघडला तर समोर माझे शेजारी जॉन अंकल, "Hey Willy, who is shouting in your room?" त्यांना कसंबसं समजावलं टीव्हीचा व्हॉल्युम लाऊड झाला होता म्हणून. अरे यार, पण माझ्या गाण्याला कोणीतरी ओरडणं म्हणाव. माझा पिकनिक फ्रॉम होमचा उत्साहच मावळला.

पण एक गोष्ट कळली सगळ्याच गोष्टींचा आनंद फ्रॉम होम नाही घेता येत. पुढच्या वेळेस प्रत्यक्षच प्रकट होईन! 😍

You can Like, Share & Comment
- संतूवाणी

कोरोना काळ

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

अभिजित3 years ago

😂😂 आत्मवृत्त पण विलासी.

वर्षा एस.3 years ago

My God!! What an imagination!! 👏🏻👏🏻🙏🏻 just superb

शैलेश उर्फ शैका3 years ago

Not a Imagination, Santosh Khare sang. Tuzhi pida prabhuncha nave mandlis ki nahi. 😀😀😀

विलास पी.3 years ago

तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम 🙏

रविदत्त3 years ago

हो रे मिञमंडळीं पासून लांब राहत असता अशीच काहीशी मनोवस्था असते.👌👌

राजश्री3 years ago

Sahi, संतू तुसी ग्रेट हो👍

अवधूत3 years ago

मजा आली वाचताना. खरंच कोणताही लेखन प्रकार तू हाताळू शकतोस 👍🏻🖋️

समीर3 years ago

संतू नेहमीप्रमाणेच सुंदर ,मला पण तुझ्या गाडीत घे रे मागच्या सीटवर बसून आनंद घेईन 👍🏻🙏🙏

सुनील3 years ago

नेहमीप्रमाणेच बहारदार 👍🏼👍🏼👍🏼

प्रदीप3 years ago

तुझ्या लेखन कौशल्याला सलाम मित्रा🙏👌सुंदर👌

संजय के.3 years ago

मस्त 👌👌👌👌👌

प्रसाद3 years ago

😂😂😂 मस्त 😍

विलास के.3 years ago

witty 👏👌

गणेश3 years ago

🙂👌👍

नेत्रा3 years ago

👌

प्रशांत3 years ago

👌👌👌👍👍
Read more in this section:
माझा भारतबंदितील जीवनयुद्ध कोरोनाचसोशल डिस्टन्सिंग - सोसल काय?भेटि लागी जीवाएक होता कोविड योद्धासंतूवाणी आला परतुनीपास झाला! किती टक्केना-हरकत प्रमाणपत्रपिकनिक फ्रॉम होममास्कसम्राट