'संतोष' नावातच टॅलेंट आहे. भारतीय रेल्वची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ट्रेन मॅनेजर ह्या पदावर कार्यरत. म्हणजे रेल्वेचा कायम विनातिकीट प्रवास आणि ट्रेनमध्ये एकट्यासाठी केबिन मिळवणारा भाग्यवान. ट्रेनने प्रवास करतात त्यांना माहित असेल हे भाग्य काय आहे! संतोष हा पुणे-इगतपुरी-रत्नागिरी मेल एक्सप्रेस मार्गावर ये-जा करत असतो. कधी त्यामार्गावर असाल तर हात दाखवून ट्रेन थांबवू शकता ✋🚆
संतोष आणि आपला पोष्टरबॉय अगदी शाळेपासून खास मित्र. जय-वीरूची जोडी. या दोघांचा दहावीला असतानाचा एक किस्सा नुकताच ऐकिवात आला. दहावीत एका खाजगी ट्युशन क्लासच्या सरांनी शिक्षा केली म्हणून दोघांनी क्लासच्या छपरावर दगड मारून राग व्यक्त केला होता. छपरावरील पत्र्याच नुकसान झाल होत. जरी अंधार असला तरी देव बघत असतो. 😊 कोणीतरी सरांना ह्यांचे कारनामे सांगितले. सरांनी दोघांच्या पालकांना बोलवून घेतलं. प्रकरण पार पोलीस स्टेशनला जाता जाता राहील. (कालाचौकीके दो गुंडे - कलव मुंडे, कलव मुंडे अशी घोषणा तेव्हा प्रचलित होती म्हणे 😉)
शाळेत असताना संतोषचे वास्तव्य आंबेवाडी ह्या ठिकाणी होते. सध्या आपल्या वर्गातील दिग्गजांच्या वास्तव्याने बहुचर्चित असलेल्या मुलुंडचा निवासी. संतोष ग्रुपवर फारसा व्यक्त होत नाही (म्हणजॆ माझ्याएवढा). पण मित्रांसोबतची अगदी ताजी आठवण म्हणजे नवी मुंबईतील नवीन गट (?) स्थापनेच्या नाट्यात मुंढेसाहेब अगदी शेवटच्या क्षणी सामील झाले आणि आमचा आनंद द्विगुणीत केला.
गणेश2 years ago
विजय 2 years ago
अनिल2 years ago
शैका 2 years ago
समीर2 years ago
सुनील2 years ago
संतोष एम2 years ago
रवीदत्त 2 years ago
अभिजीत 2 years ago
सुरेश2 years ago
प्रदीप2 years ago
संजय के2 years ago
संजय के2 years ago
मनीषा2 years ago
संजय के2 years ago
प्रसाद2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा