डॉक्टर वर्षा शहा, प्राचार्य, रिझवी इंजिनीयरिंग कॉलेज. It's big achievement ! तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर तुमच्या ओळखीमध्ये , मित्रपरिवारामध्ये इंजिनीयर खूप सापडतील पण प्रिन्सिपॉल, इंजिनीयरिंग कॉलेज किती सापडतील? त्यानिमित्ताने आम्हाला पण थोडा भाव खाता येतो.
शाळेत असताना वर्षा अभ्यासात हुशार तर होतीच. पण माझ्या लक्षात असलेली वर्षा म्हणजे चिडखोर, आगाऊ मुलगी. (आत्ता चिडू नकोस हं ! ) आम्ही सातवीच्या स्कॉलरशिप क्लासेस साठी एकत्र शिकत असू तेव्हा तिचे एकदा संजयबरोबर भांडणपण झाले होते. तसा संजयपण व्रात्य, मस्तीखोरच होता / आहे. 😄
शाळेनंतर बऱ्याच वर्षांनी वर्षाची भेट झाल्यावर जाणवलेली गोष्ट म्हणजे तिचं बदललेलं व्यक्तिमत्त्व. एकदम शांत, संयमी आणि निगर्वी भासली. (कदाचित भासही असेल) स्पष्टवक्तेपणा मात्र अजून तसाच कायम आहे. ग्रुपवर कधीकधी नाठाळ विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा प्रयन्त करते. (परंतु ते आता प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नाही. हम नही सुधरेंगे) 😊
माझ्यासारख्या कायम लेक्चर ऐकणाऱ्या माणसाला तिने त्यांच्या कॉलेजमध्ये लेक्चर देण्यासाठी तयार केलं, ही जवळपास डॉक्टरेट लेव्हलची कामगिरी आहे. त्यावरून जाणवतं वर्षा प्राचार्यपदाची धुरा उत्तमरीत्या सांभाळत आहे. शिक्षणक्षेत्राशी संबंधित काही माहिती हवी असल्यास मदत आणि मार्गदर्शन तिच्याकडून नेहमीच मिळतं. (हा माझा अनुभव आहे) 👍
माझ्यासारख्या स्वयंघोषित कुलगुरूंकडून तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 💐
राजश्री2 years ago
संभाजी2 years ago
विजय2 years ago
रविदत्त2 years ago
अनिता2 years ago
शैका2 years ago
वर्षा2 years ago
गीता2 years ago
नीना2 years ago
विनय2 years ago
वैशाली2 years ago
सुनील2 years ago
गणेश2 years ago
कीर्ती2 years ago
दयानंद2 years ago
निकेता2 years ago
प्रकाश2 years ago
संजय डी.2 years ago
समीर2 years ago
अवधूत2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा