सर्वप्रथम अवधूतचे मनापासून आभार! स्नेहसंमेलनच्या दिवशी आम्हाला (संध्या, वैष्णवी, सुनील आणि मी) घरपोच केल्याबद्दल. अवधूतच्या झेड प्लस कारमधून पूर्वी एकदा प्रवासाचा आनंद घेतला होता. त्यामुळे तो सराईत वाहनचालक आहे हे ज्ञात होते. विमान चालवणाऱ्या अवधूतास य:कश्चित कारचे काय कौतुक म्हणा! जमिनीवर ज्या सहजगतीने चालावे तसा तो गगनात विहरतो. त्याची एकूण क्षमता पाहता तो पाण्यावरदेखील चालू शकेल. (चालु 🚶माणूस )
आम्ही एसी. टॅक्सीने सुद्धा घरी जाऊ शकत होतो पण मग आम्हांस अवधूतबाबांचा सत्संग ही लाभला नसता आणि मला लिहताही आलं नसतं. अवधूतने गुगलमॅपला कामाला लावलं आणि परतीचा प्रवास सुरु केला. आमच्याकडे सुनीलसारखा एक चांगला मार्गदर्शक होता, पण त्याची तब्येत ठिक नसल्याने तो डोळे मिटून बसला होता. बाकी वैष्णवी, संध्या आणि माझा मार्गदर्शनासाठी काहीच उपयोग नव्हता. आधीच माझं दिशाज्ञान अगाध, त्यात गुगलमॅपवर मला 🔔 काय समजत नाही. (मला फक्त ते रेल्वेचं 'अगला स्टेशन कॉटन ग्रीन' एवढं बरोबर समजतं )
त्या गुगलमॅपवाल्या बाईच्या भरवशावर आमची दरमजल सुरु होती. मुलुंडवरून काळाचौकीला येताना ईश्वरी रचनेने आम्ही ठाण्यात पोहचलो. 😀 विनाकारण एक टोल लागला. टोलचा मेसेज वहिनींच्या मोबाइलवर जातो म्हणजे घरी पोहचल्यावर वहिनींनी अवधूतला टोलवलं असेल ते वेगळं. ती चूक सुधारून पुन्हा काळाचौकीच्या वाटेस लागलो.
बीकेसी च्या आसपास कुठंतरी ती मॅपवाली बाई ओरडत होती, टर्न लेफ्ट टर्न लेफ्ट पण ...आपले अंतर्ज्ञानी बाबा ऐकतायत होय, बाबांनी आम्हाला बीकेसीची सहल घडवली. त्यानंतर मात्र सुनीलला दक्ष राहवचं लागलं. वैष्णवीने तर एवढा धसका घेतला कि ती खिडकीतुन दिसणारे सगळे साइनबोर्ड वाचुन सांगायला लागली. (आकाशात साइनबोर्ड नसतात ना, त्यामुळे अवधूतची गडबड झाली असावी) त्यानंतर मात्र कुठेही न चुकता सुखरूप घरी पोहचलो ( हे महत्त्वाचं! )
लेखाचं तात्पर्य हे की, आयुष्यात महापुरुषांकडूनही चुका होतात पण त्या चुका सुधारून योग्य दिशेने मार्गक्रमण करीत ध्येय साध्य करावे. 👍
शैलेश के.3 years ago
रविदत्त3 years ago
अवधूत3 years ago
गीता3 years ago
प्रदीप3 years ago
समीर3 years ago
नेत्रा3 years ago
शैका3 years ago
संजय डी.3 years ago
दयानंद3 years ago
गणेश3 years ago
नीना3 years ago
सुनील3 years ago
मनीषा3 years ago
वर्षा डब्लू.3 years ago
विलास के.3 years ago
वैशाली3 years ago
नरेश3 years ago
प्रसाद3 years ago
संजय के.3 years ago
वर्षा एस.3 years ago
राजश्री3 years ago
संध्या3 years ago
सुरेश3 years ago
विनय3 years ago
प्रकाश3 years ago
अनिल3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा