लॉक डाऊन सुरू झाल्यापासून बघतोय. ग्रुपमधल्या मैत्रिणीपण चांगले चांगले पदार्थ पोष्ट करायला लागल्यात. (सॉरी.. हां मित्र म्हणायच होत.) मैत्रिणींबद्दबद्दल काय बोलावे? एकूणच आज की नारी जगात भारी. म्हणजे नोकरीपण करायची आणि घरदेखील सांभाळायच अशी तारेवरची कसरत लीलया करतात.
तर लॉक डाऊन च्या निमित्ताने बराचसा मोकळा वेळ हाती आला, म्हणजे वेळ पूर्वीपण होता पण तो वेळ काढावा लागत असे. आता वेळ घालवायचा कसा हा प्रश्र्न आहे? (माझ्याबद्दल नाही बोलत, मला खूप काम आहे 😂)
बऱ्याच मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना दिली. (माझ्यासारखे काही निर्गूण मात्र अजूनही स्वत्वाचा शोध घेतायत.) अडगळीत गेलेले रंग आणि ब्रश बाहेर आले. अजूनही कॅनव्हासवर सफाईदारपणे फिरू शकतात याची जाणीव झाली. काहीजणांनी गायनकलेचा नमुना पेश केला. काही नवीन गायक लाभले. शीघ्रकवी लाभले, महत्त्वाच म्हणजे दर्दी रसिक लाभले.
अगदी गब्बर आणि फुलराणी अशी पूर्णतः वेगवेगळी पात्र मधली सुट्टीच्या मंचावर अवतरली. फुलराणी एकच होती पण गब्बरमध्ये व्हरायटी होती. गब्बर इंग्लिश मिडीयमचा किंवा मालवणचाही असू शकतो हा साक्षात्कार इथेच झाला. तर आपला मूळ मुद्दा होता पाककलेचा. सुगरणींईतकेच बल्लवाचार्यही जोशात आहेत.
केकचे विविध प्रकार, फळाच्या सालींच लोणच, ट्रुटिफुटी म्हणजे साला काय अफलातून कल्पना. एका केकच नाव एवढ मोठ होत कि तो बनवण्यापेक्षा नाव लिहायला जास्त वेळ लागावा. हे सगळे पदार्थ बनवल्यानंतर स्वयंपाकघराची आवराआवर आलीच! मास्तरांनी तर शास्त्रोक्त पद्धतीने भांडी कशी घासावीत याचे क्लासेस सुरू केलेत. ( प्रात्यक्षिक म्हणून विद्यार्थ्यांकडून घरची भांडी घासून घेतात अस ऐकलय 😘)
हळूहळू कोरोनाच्या दहशतीवर मात करून एक सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न. अधून मधून विलायतेहून आलेल्या ज्ञानबिड्या फुंकायच्या (आगपेटी अर्थातच पुणेरी). काहीजणांनी मिळालेला वेळ सत्कारणी लावून स्वतःला अपग्रेड (श्रेणीसुधारणा) केल. मला काही ते जमल नाही (कारण मी ऑल-रेडी ऊच्चश्रेणीत आहे. अजूनहि काही मित्र असतील माझ्यासारखे 😉) असो !
विनायक5 years ago
संजय डी.5 years ago
विनोद5 years ago
अवधूत5 years ago
गीता5 years ago
विलास के.5 years ago
प्रशांत5 years ago
विलास पी.5 years ago
किर्ती5 years ago
विकास सी.5 years ago
सुनील5 years ago
गणेश5 years ago
प्रदीप5 years ago
प्रसाद5 years ago
वैशाली5 years ago
संजय के.5 years ago
अभय5 years ago
समीर5 years ago
अभिजित5 years ago
राजश्री5 years ago
नीना5 years ago
विनय5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा