१५ ऑगष्ट २०२२

एक मुलाखत - गटप्रमुखांची

संदर्भ: काळाचौकीच्या मित्रांची नवी मुंबईत अचानक ठरवून आणलेली सदिच्छा भेट.

काल नवीमुंबईत झालेल्या घडामोडींनंतर ग्रुपवर विविध चर्चांना उधाण आले. त्या अनुषंगाने आमचे शिष्ट पत्रकार आ. ग. लावे यांनी आमदार संतूवाणी यांची रोकठोक मुलाखत घेतली.
(खालील मुलाखतीमधील सर्व घटना व पात्रे काल्पनिक आहेत. व्यक्तिरेखांमध्ये काही नामसाधर्म्य आढळ्यास तो निव्वळ योगायोग समाजावा.)

पत्रकार: नमस्कार साहेब, डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालू. काल ग्रुपवर नवीन गट स्थापनेची जी जोरदार चर्चा झाली. त्यात कितपत तथ्य आहे.
संतूवाणी: हे साफ खोटं आहे. काही पत्रकारांनीच ह्या वावड्या उठवल्या आहेत.
प का: पण पोष्ट झालेल्या छायाचित्रांवरून वेगळेच दृश्य दिसतंय. ग्रुपवर पोष्ट करायला नसतात एवढे आमदार मित्र अचानक एका ठिकाणी जमतात हे थोडं संशयास्पद आहे.
सं वा: असं काही नाही. ही ग्रुपची अनौपचारिक बैठक होती. पक्षश्रेष्ठींनी ज्यांना निमंत्रण धाडलं त्यातले काही आले काही नाही आले. सुदैवाने ह्यावेळी जास्त मित्र रिकामटेकडे होते.
प का: मेळावे, बैठका भरवणे ही मुख्यतः आ. सुनील यांची जबाबदारी असे. पण ह्यावेळी तुमचं नाव जोरदार चर्चेत आहे. असही बोलल जातंय की आमदार सुनील यांच ग्रुपमधील वर्चस्व कमी करण्यासाठी पक्षाकडून ही खेळी करण्यात आली आहे.
सं वा: (मोठयाने) हा हा हा ! हे फारच हास्यास्पद विधान आहे.
प का: पुणे गटाचे आमदार नेहमी पुढे असतात, काल त्यांच्या अनुपस्थितचे कारण काय?
सं वा: पुणेकरांना नेहमी पुढे पुढे करायची सवय आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुढच्या कार्यक्रमांसाठी राखून ठेवलयं.
प का: काही आमदार मित्रांचा असा आरोप आहे कि तुम्ही त्यांना हेतुपुरस्सर डावललेलं आहे.
सं वा: गैरसमज आहे. लवकरच हा गैरसमज दूर होईल. बाकी कुणी कुठे कसं भेटावं हि ईश्वरी रचना असते. आमदारांच्या सुरक्षेच्या दृष्टिने, वरून जो आदेश आला त्याचं आम्ही पालन केलं.
प का: बैठकीत नेमकं काय घडलं हे सांगू शकाल का? कारण भिन्न मतप्रवाह असलेले आमदार एकमेकांशी गळाभेट करताना दिसत होते.
सं वा: (किंचित हसून) तुमच्या बोलण्याचा रोख कळतोय. आ. विवेक हे रांगडं व्यक्तिमत्व आहे. व्हाटसप वर Vivek Typing.. हे काहीजण Vivek Fighting .. असं वाचतात. पण प्रत्यक्ष भेटीत त्यांच्या मनाचा मऊपणा जाणवतो.
प का: मन असं हाताने दाबून बघता येतं का?
सं वा: आगलावे तुमचं शिक्षण इंग्लिश मिडीयम मधून झालय का?
प का: अरे वा साहेब! तुम्ही कस काय ओळखलंत?
सं वा: तुम्ही 'मन' दाबायचा विचार करताय त्यावरून. मन हा अवयव नाही. मनाला स्पर्श करणे हा वाक्यप्रचार आहे. विवेक ह्यांच्या भाषेत सांगायचं तर अहंकारविरहित माणसं भिन्न मतप्रवाहात समाधानाने राहू शकतात. आता अहंकारविरहीत म्हणजे वसनविरहीत समजू नका म्हणजे झालं.
प का: साहेब! शेवटचा प्रश्न. तुम्ही मघापासून वरून आदेश, श्रेष्ठी असा वारंवार उल्लेख करताय ते पक्षश्रेष्ठी कोण आहेत.
सं वा: बिगबॉस दिसत नाही फक्त आवाज येतो. आम्हाला पक्षश्रेष्ठी कळले कि लगेच तुम्हाला कळवतो. या आता!
प का: धन्यवाद! 🙏
- संतूवाणी

माझे शाळासोबती

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

विजय4 years ago

👍🏻👍🏻👍🏻👍🏻कालची भेट ही मुद्दाम केली नव्हती. पण चांगला response होता.
डावलण्यात आलेल्या आमदारांची नावे जाहीर केलीत तर बरं होईल

संतोष एम4 years ago

👌🏻👌🏻👌

संजय के4 years ago

👍👍👍

अनिल4 years ago

🙏🏻🙏🏻🙏

समीर4 years ago

😍😍👌मला वाटतं योगायोगाने हा ग्रुप देखील अडीच वर्षांपूर्वी स्थापन झाला होता का 🤪

विलास के 4 years ago

Love it! 👍

अभिजीत4 years ago

👍👍😁😁

रविदत्त4 years ago

तरी पण आम जनतेच्या हिताच्या दृष्टीने काहीतरी सकारात्मक घडतय याची हि झलक असल्याच जाणवतय👌👍😍

अवधूत4 years ago

कितीही मखलाशी केलीस म्हणून कर्मभोग चुकायचा थोडीच रहाणार आहे. तांत्रिकदृष्ट्या वाचलास. मांत्रिकदृष्ट्या कसा वाचशील😁

गणेश4 years ago

Creative... 😀👌

प्रदीप4 years ago

छान...🤪 फक्त पक्षश्रेष्ठी कडून लवकर पॅकेज जाहीर करा...💁🏻‍♂️

संजय डी4 years ago

कोणासही डाव ललेलं नाही हे स्पष्ट केलंत ते बरं झालं.😀

शैलेश के 4 years ago

फारच सुंदर 👌👌👌

विलास पी4 years ago

अशा मुलाखती नेहमी दोन भागात असतात. दुसरा भाग लवकर प्रसिद्ध करा प का महोदय 😁
Close Video ❌
Share