प्रसाद प्रसादासारखी फाऊंटन पेनं वाटत सुटलाय. आतापर्यंतचे भाग्यवान विजेते गीता, सुनील आणि राजश्री. बघू पुढच्या लॉटरीत कोणाचा नंबर लागतो? अजूनही काही मित्र-मैत्रिणींना फाऊंटन पेनचं वेड आहे हे बघून छान वाटलं. वेडी लोकंच इतिहास घडवितात असं म्हणतात. ( थोडे दिवस आपण वाट बघू हे इतिहास घडवतायतात का? नाहीतर आपण शहाणे आणि ते वेडे 😀)
शाळेत असताना खूप आकर्षण होतं फाऊंटन पेनचं. फाऊंटन पेनने हस्ताक्षर सुंदर येतं म्हणायचे. म्हणजे खूप प्रयत्न करून यायचं, बऱ्यापैकी चांगलं अक्षर! पण विनय, अनिल घवाळे, पीके, दिलीप मालप, निलेश नाबर यांच्याइतकं सहजगत्या चांगलं हस्ताक्षर कधी जमलंच नाही. ( कदाचित त्यांची पेनं चांगली असतील)
तेव्हा बरीच फाऊंटन पेनसुद्धा बदलून बघितली. मग मी आणि सुनील एकमेकांच्या अक्षरांची तारीफ करायचो. सुनीलचं हस्ताक्षरही फार सुंदर नव्हतं, पण मार्केटमध्ये नवीन पेन आलं की ते सुनीलकडे यायचं.
कधीतरी फळ्यावर सुविचार पण वाचनात आला होता "सुंदर अक्षर हाच खरा दागिना" तेव्हांच ठरवलं, दागिन्यांची हाव बरी नाही. आणि हो! फळ्यावर खडूने एका सरळ ओळीत लिहणे हीसुद्धा एक कला आहे.
पूर्वीपेक्षा आता पेनचा वापर कमी झालाय किंवा आपण पेनाने जास्त लिहीत नाही म्हणून तसे वाटत असेल. पण लेखणी ही मोल्यवान गोष्ट आहे.(म्हणूनच बँकवाले पेन दोरीने बांधून ठेवतात 😉)
प्रसाद, तू अजूनपर्यंत फाऊंटन पेनची आवड जपलीयस आणि आपली आवडती वस्तू दुसऱ्याला भेट म्हणून देऊन त्यात आनंद शोधणे ह्या तुझ्या दिलदार वृत्तीला सलाम. त्यासाठी पैशाची नाही तर मनाची श्रीमंती जरूरी असते.
बरं तुमच्या ह्या पेनद्या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रुपमध्ये पेनावर बऱ्याच लक्षणीय शाब्दिक कोट्यापण आल्या. वाचायला मजा आली. अधूनमधून असेच सोहळे साजरेकरत चला! 👍
गीता4 years ago
संजय डी.4 years ago
अवधूत4 years ago
विनायक4 years ago
रविदत्त4 years ago
वैशाली4 years ago
विजय4 years ago
राजश्री4 years ago
वर्षा डब्ल्यू.4 years ago
सुनील4 years ago
नीना4 years ago
दयानंद4 years ago
संजय के.4 years ago
विलास के.4 years ago
नेत्रा4 years ago
अभिजित4 years ago
प्रशांत4 years ago
प्रसाद4 years ago
प्रदीप4 years ago
समीर4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा