आता पाऊस तारूण्यात आलेला असतो, शाळा संपवून कॉलेजमध्ये जाऊ लागलेला असतो. आता आपल्यालाच पैसा कमी पडतो, पावसाला कुठून देणार? बालकवींची , श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे , हि कविता तीच असते. पण हिरवळीचा अर्थ मात्र बदललेला असतो. 😎
वरूणराजाचे रूपहि आता बदललेले असते. आता कोसळणारा पाऊस तरूणाईसारखा बेधुंद, बेधडक असतो. काहीजणांसाठी तो रोमँटिक असतो. मनात रिमझिम गिरे सावन सारखी रोमँटिक गाणी वाजत असतात. कालपरत्वे गाणी बदलतात पण पाऊस तारूण्याला रोमांचित करतोच! प्यार हुआ इकरार हुआ गाण्यामधील एका छत्रीतले नर्गिस-राजकपूर आठवणारच! ☂️
कॉलेजमध्ये एका छत्रीत तिच्या सोबत केलेला खट्याळपणा मनात रुंजी घालत असतो! पावसात छत्री शेअर करणारी कुणीतरी मिळणे हे भाग्य सर्वांनाच लाभत नाही. पण म्हणून इतरांसाठी पावसाचे महत्त्व कमी होत नाही. त्यांच्यासाठी जिवाभावाचे मित्र असतात, पावसासारखे लहरी!
कॉलेजचे लेक्चर पावसात बुडवून मित्रांसोबत टपरीवरचा चहा आणि सोबत गरमागरम बटाटेवडे , भजी यातही मज्जा असते. सरतेशेवटी आनंद ही सापेक्ष गोष्ट आहे. पावसाळी पिकनिक तर हमखास आखली जाते. म्हणजे बरसात और अंगूर की बेटी डेडली कॉम्बिनेशन! दुनियाने हमको दिया क्या, दुनियासे हमने लिया क्या अविर्भावात पिकनीकमध्ये केलेला दंगा! 💃🕺
वैधानिक इशारा खुंटिला टांगून शिलगावलेली सिगारेट...
ते वयचं तस असतं, त्या वयात केलेल्या अतरंगी गोष्टी आठवल्या तर स्वतःचचं स्वतःला हसू येतं. अक्कल गहाण टाकण्याचेचं वय असतं ते आणि पावसात तर त्याला अजूनच ऊधाण येतं. पावसातील बेधुंद मनाच्या लहरी!
आता खिडकीबाहेरचा पाऊस बघताना संतूवाण्याच्या मनात 💞
मनीषा3 years ago
विनायक6 years ago
सुनील6 years ago
प्रदीप6 years ago
रविदत्त6 years ago
नेत्रा6 years ago
संजय डी.6 years ago
किर्ती6 years ago
वैशाली6 years ago
प्रसाद6 years ago
गणेश6 years ago
विनायक6 years ago
सुनील6 years ago
गणेश6 years ago
गीता6 years ago
प्रशांत6 years ago
वर्षा डब्ल्यू.6 years ago
नीना6 years ago
विलास के.6 years ago
शैलेश डी.6 years ago
मनोहर6 years ago
संजय के.6 years ago
अभिजित6 years ago
राजश्री6 years ago
अनिता6 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा