Energy At 50+🥳 प्रशांत, मित्रा तू शांत बसायचचं नाही अस ठरवलयसं जणू! कधी गाणं, कधी अभिनय, तर कधी चक्क नृत्याविष्कार!!! पन्नाशीतही तू दाखवलेल्या एनर्जीला दाद द्यावी लागेल. इतर समवयीन मित्रदेखील कार्यालयीन कामकाज सांभाळून काही ना काही करत असतात. पण त्याला फारशी ऊर्जा लागत नाही. जसं की, कुठल्याशा कार्यक्रमास हजेरी लावणे, चिंतन बैठक, मित्रांबरोबर वडापाव खाणे, पुण्याच्या शेतात नुसतेच उभे रहाणे किंवा झाडावरून पडलेले बोंडू गोळा करणे. 😝
रंगमंचावर समूहनृत्य सादरीकरण सोपी गोष्ट नाही. बरीच रिहर्सलही करावी लागत असेल. आपल्या वरात-डान्समध्ये सगळ कसं उत्स्फूर्त असतं. तालीम करावी लागत नाही. एनर्जी कमी झाली तर एनर्जी ड्रिंक्स असतात. पण तू जे करतोयस त्याला मनापासून आवड आणि इच्छाशक्ती हवी. एक गोष्ट मात्र तूही मान्य करशील, तू जी कलाकारी दाखवतोयस त्यात तुझ्या पत्नीचा पाठिंबा ही मौल्यवान गोष्ट आहे. वहिनींच्या जीवावर तर तू कलागुण उधळतोयस 😍
माझ्या मनमोराने कधी असा नृत्याविष्कार करण्याची इच्छा व्यक्त केली तर ... "नसत्या फंदात पडू नका. चालताना धडपडता. आता ह्या वयात नाचताना हातपाय मोडला तर केवढ्याला पडेल? त्यापेक्षा बाजारात जाऊन भाजी आणा."
असा प्रेमळ सल्ला आमच्या सौ.कडून दिला जातो. मग आमचा मनमोर चूपचाप पिसारा म्यान करून मोबाइल बघत बसतो. असो! बऱ्याच मोरांची हीच परिस्थिती असावी.😀
शाळेत असताना फारसा न चमकलेला तू आता मात्र आपल्या ग्रुपवरचा चमचमता तारा आहेस. ऑफिस वर्कसोबत बी.पी.टी च्या रंगमंचावरसुद्धा तुझ्या नारदमुनींचा संचार असतो. गायक आणि अभिनेत्यांची आपल्या ग्रुपवर रेलचेल आहे. पण कौटुंबिक जबाबदारीतून वेळ काढून ती आवड जोपासणारे तुझ्यासारखे कमीच. लॉकडाऊन एन्जॉय करण्याच्या सुरूवातीच्या काळात ग्रुपवर गीताबाईंनी जी अभिनय कार्यशाळा आयोजित केली होती, त्यात तू सादर केलेला चष्मिस गब्बरसिंग अजूनही लक्षात आहे ! ढिसक्यांव ढिसक्यांव .🔫
अभिनय , चित्रकला, छायाचित्रण, गायन अशा विविध कला जोपासणारा कलाकार माणूस आहेस तू! मीपण थोडफार गातो पण त्याला गायनकला म्हणता येणार नाही. आपल्या मित्रपरिवारात कोणी गायक असला कि आपण त्याला किशोरकुमार हि पदवी देऊन टाकतो. तसा तुझा आवाज कधी कधी किशोरकुमारसारखा लागतो. (आणि आमच्या ह्या किशोरकुमारला गाण्याच्या कार्यक्रमाहून घरी जाताना कोथिंबीर जुडीसुद्धा घेऊन जावी लागते ) प्रापंचिक जीवनगाणे सुरेल होण्यासाठी ही कोथिंबीर आवश्यक असते म्हणा.
प्रशांत मित्रा असाच उत्साही रहा.👍 पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! गाता रहे तेरा दिल ! 🎤
प्रशांत1 year ago
महेश2 years ago
प्रदीप2 years ago
प्रसाद2 years ago
संजय डी.4 years ago
विनायक4 years ago
समीर4 years ago
गीता4 years ago
विराज4 years ago
अवधूत4 years ago
गणेश4 years ago
दयानंद4 years ago
अभिजित4 years ago
रविदत्त4 years ago
अभय4 years ago
विजय4 years ago
सुनील4 years ago
नीना4 years ago
निकेता4 years ago
विलास के.4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा