स्नेहसंमेलन २०२१ उत्साहात साजरं केल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मित्रमैत्रीणींचे मंडळ आभारी आहे. गीताने एक छोटासा मेसेज पोष्ट केला आणि त्याला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात (जीवनात भगवतगीता आणि ग्रुपवर बडबड गीताला फॉलो करत चला. तुमचे कल्याण होईल 😃)
स्नेहसंमेलनासाठी काळाचौकीच्या नगांना इच्छित स्थळी पार्सल करण्याची जबाबदारी देवाने (म्हणजे टॅक्सिवाला देवा माने) घेतली होती. परतीची जबाबदारी अवधूतदेवाने पार पाडली (त्याची कहाणी वेगळ्या भागात) सभागृहात पोहचण्यापूर्वीच सजावटीचे काम रवीदत्तच्या देखरेखेखाली पूर्ण झालेले होते.
भरगच्चं कार्यक्रमाची सुरुवात ओळखपरेडने झाली. दरवेळेस कोणीना कोणी नवीन मेंबर असतातच आणि जुन्यांची उजळणी होते. ओळखपरेडमध्ये एका क्षणी प्रशांतने सर्वांच्या काळजाचा ठोकाचं चुकवला होता. त्यानंतर मात्र डॉन प्रशांतने यम्मा यम्मापर्यंत धुमाकूळ घातला.
ह्या गेटटुगेदरमधील नाविन्य म्हणजे अभयने केलेले खेळांचे आयोजन. ग्लास पाडणे, रिंग टाकणे यांसारखे देशी खेळचं होते, पण अभय इंटरनॅशनल स्कुलचा मॅनेजर असल्याने खेळात गाढवाऐवजी रेनडिअर आणला होता. रेनडिअरच्या विविध अवयवांवर नाक चिकटवून खेळाडूंनी आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन केलं. ग्लास पाडणे, रिंग टाकणे या खेळांमध्ये प्रीतमने चमकदार कामगिरी केली. तिच्या मैत्रिणी उगाचच उंचीचा फायदा, उंचीचा फायदा असं ओरडत होत्या. कारण सुनील, सुरेश, नरेश (काका दळवी) सारख्या कमी उंचीच्या खेळाडूंनी स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून दाखवले. संगीतखुर्चीमध्ये मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त असतानासुद्धा अनिताने शेवटपर्यन्त खुर्ची लढवली व विजेतेपद मिळवले. आमच्या पाटलांनी पाटीलकीच्या नादात विजेतेपद गमावलं. 😂
सगळ्यात सरप्राइज आयटम होता रॅम्पवॉक ! वैष्णवी सुरेश फापाळे हिने आम्हाला कॅटवॉक करत रॅम्पची झलक दाखवली पण... आमच्यासारखे आम्हीचं! त्यामुळे काका-मावशांनी तिलाच टायगरवॉकचे विविध प्रकार दाखवले. उदा. प्रीतम आणि नेत्राचा वॉक म्हणजे आई-मुलीला शाळेत घेऊन जातेय. विनयच्या रॅम्पवॉकवर माझ्या मुलाची प्रतिक्रया, "हा काका मस्त चाललायं बागेत चालतात तसं!" काहीजणांनी मात्र सुंदर वॉक केलं रॅम्पवर. पण एकूणच मजेदार प्रकार.😃
भोजनव्यवस्था छान होती. मी दर्दी खवय्या नसल्याने त्यातलं जास्त काही कळत नाही. रुचकर आणि पोटभर जेवण होतं. आणि हो दुसऱ्या कुणीतरी केलेल्या छान पुरणपोळ्यांवर कुणीतरी उगाचचं भाव खात होतं.😉 भोजनानंतर गीतगायनाचा मुख्य कार्यक्रम होता. गाण्याविषयी मास्तरांच्या कैफात बरंच काही आलयं त्यामुळे प्रस्थापित गायकांना बाजूला ठेऊन थोडं उदयोन्मुख गायकांविषयी बोलू.
नवी मुंबईका उभरता सितारा नेत्रा परब. काळाचौकीचा आत्मविश्वास घेऊनच स्टेजवर गेली आणि तिने "कोणतं गाणं गाऊ?" असा प्रश्न विचारला. 'रुपेरी वाळूत माडाच्या बनात' बऱ्यापैकी गायली ती. (त्यातला हाऽय्य् जरा चांगला जमला) झालं असं की तिचा आत्मविश्वास भलताचं वाढला आणि ती गीता, नीना ह्यांच्यासोबत एका क्लासिकल गाण्यासाठी उभी राहिली (पण तिने समजून वेळीच माघार घेतल्यामुळे ते गाणं आणि आम्हीपण वाचलो)😍
मराठीभाषाप्रेमी वर्षा शहा हिचही गायन क्षेत्रात पदार्पण! पहिल्याच प्रयत्नात पांडू हवालदार चित्रपटातील ऑफ बीट सॉंग. ती अशी एकमेव गायिका होती जिच्या गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनी बॅकग्राऊंड म्युझिक दिलं. शैलेश कामतला कुणीतरी सहज विचारलं, "तू गातोस का?" तर तोही सिरीयसली गायला. नशीब छान गायला नाहीतर आम्हाला विचारावं लागलं असतं, "तू का गातोस?"
सरतेशेवटी केक-कटिंग, समूहनृत्य, बक्षीस समारंभ (प्रायोजक अभय) आणि आभारप्रदर्शनाने स्नेहसंमेलनाची सभागृहातील सांगता झाली. पण खरी सांगता मुलुंड पोलीस स्टेशनला झाली. (त्याची वेगळी संतूवाणी येईल)
विशेष : सर्वांनीच गेटटुगेदर मध्ये उत्साह दाखवला पण माझ्या मते कन्याशाळेने काकणभर जास्त उत्साह दाखवला. पुन्हा भेटू 🙏किसन3 years ago
अनिल3 years ago
प्रदिप3 years ago
गीता3 years ago
अभय3 years ago
समीर3 years ago
नरेश3 years ago
विनायक3 years ago
विजय3 years ago
राजश्री3 years ago
संजय के.3 years ago
वर्षा डब्लू.3 years ago
नेत्रा3 years ago
दिलीप3 years ago
समिता3 years ago
महेश3 years ago
विलास के.3 years ago
दयानंद3 years ago
प्रसाद3 years ago
वैशाली3 years ago
विनय3 years ago
वर्षा एस.3 years ago
प्रशांत3 years ago
गणेश3 years ago
सुनील3 years ago
संतोष एम.3 years ago
संजय डी.3 years ago
रविदत्त3 years ago
सुनीता3 years ago
संध्या3 years ago
नीना3 years ago
विलास पी.3 years ago
अनिता3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा