अनिल उर्फ डॉक्टर. मेडिकलची कोणतीही परीक्षा न देता ज्याला आपण मित्रांनी डॉक्टर बनवलं. कसला घंटेचा डॉक्टर ! 🔔 हां बहुतेक त्याचाच. ह्याची डॉक्टरकी म्हणजे मित्रांच्या खास अवयवाला आवडतील असे नयनरम्य मेसेज पोष्ट करण्यापूरती. नयनरम्य म्हंटल्यावर मनकवड्या मित्रांनी ओळखलेच असेल तो खास अवयव म्हणजे नयन.
शाळेत असताना आमच्या वर्गात काही चांगले क्रिकेटपटू होते, त्यातलाच हा एक. खूपच फास्ट बॉलिंग टाकायचा. (अनिल, कितीही जलदगती असलास तरी अवधूतच्या बॅटसमोर मंदगती आहेस हे लक्षात ठेव ) अवधूत म्हणजे जवळपास डॉन ब्रॅडमन... तेलेगल्लीचा 😀
अनिल, नावाप्रमाणेच वाऱ्यासारखा मुक्त. स्वत:ला कोणत्याही बंधनात बांधून घेतले नाही. एकटा जीव सदाशिव ह्या ऊक्तीनुसार मार्गक्रमण.
"कुठे चाललात? कधी येणार परत? कोण आहे बरोबर?" असा 'क' चा ससेमीरा नसल्यामुळे पठ्ठ्याने देशविदेशात बरीच भटकंती केली आहे. कुडाळ, कणकवली, गोवा करत इजिप्त, इस्त्राईल, जॉर्डन...अगदी युरोपपर्यंत!
युरोप टूरमध्ये दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे सारखी सिमरन सापडता सापडता राहिली....🎸 ते शाहरुखसारख तुणतुणं वाजवायला न जमल्यामुळे. मी जेवढी भारतातील राज्य बघितली नसतील तेवढे देश फिरून आलाय. सध्या नवी मुंबईतील वाशी येथे स्थायिक.
कामापुरतं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता ग्लास फॅब्रिकेशनच्या व्यवसायात उतरला. कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी नवीमुंबईत बांधकाम क्षेत्रात चलती असल्याने धंद्यात जम बसला. दुर्दैवाने सन २००० साली एक मोठा अपघात होऊन वर्षभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यानंतर जिद्दीने पुन्हा उभारी घेतली. आता सगळं आलबेल आहे.
मित्रा, भटकंती करण्यासाठी सुदृढ रहा आणि गुटगुटीत हो ! हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!!!
प्रदीप4 years ago
अवधूत4 years ago
रविदत्त4 years ago
संजय डी.4 years ago
अनिल4 years ago
अभय4 years ago
विनायक4 years ago
प्रकाश4 years ago
नरेश4 years ago
दिगंबर4 years ago
विलास के.4 years ago
सुनील4 years ago
समीर4 years ago
संतोष एम.4 years ago
विनय4 years ago
संजय के.4 years ago
गणेश4 years ago
प्रसाद4 years ago
प्रशांत4 years ago
दयानंद4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा