पत्र लिहिण्यास कारण की, तू बरेच दिवसांपासून व्हाट्सअप वर व्यक्त होण्याचे ज्ञान मागत आहेस. चल आज तुला सर्वज्ञानी बनवूनच टाकतो.
सर्वप्रथम मराठीत टाईप करायला शिक 😀 नंतर मी सर्वज्ञानी आहे असा आत्मविश्वास तुला निर्माण करावा लागेल, निदान आव तरी आणावा लागेल.(जसा मी आणतो 😝) त्यानंतर तुला विविध क्षेत्रांचा अभ्यास करावा लागेल. अध्यात्म, खाद्यात्म, मद्यात्म, संगीत, राजकारण, खेळ, पोरखेळ, ई... सर्व विषयांचा वरवरचा अभ्यास करावा लागेल. (सखोल ज्ञानाची आवश्यकता नाही. पुड्या सोडण्याईतपत अभ्यास बस!)
आता प्रत्यक्ष पोष्टींगकडे वळू. जवळपास प्रत्येक गोष्टीत तुला मत व्यक्त करावे लागेल. तेही लगेच. सकाळी टाकलेल्या पोष्टवर रात्री दहा वाजता प्रतिक्रिया देणे म्हणजे वरातीमागून घोडे, 🐎 मग ते घोडे आपल्यालाच लागतात
जर ग्रुपमध्ये महिला असतील तर अश्लील विनोद टाळावेत कारण तुमचं खरं रूप उघडं पडेल आणि फक्त मुलांचा ग्रुप आहे म्हणून सारखे चावट,उघडे नागडे फोटो/व्हिडीओ टाकू नये. (होतं असं कि बघतातं सगळे तरी उघडे तुम्हीच पडता 😜)
कधी कधी इतरांच्या पोष्टचीपण तारीफ करावी. (नेहमी स्वत:चीच लाल करू नये) बाकी लिहायला काय? काहीपण लिहू शकतोस. आपल्याला कुठे साहित्यशिरोमणी पुरस्कार मिळवायचाय. फक्त लिखाणात कोणालाच अर्थ माहित नसतील असे चारपाच जङजव्याळ शब्द वापरावेत (त्याची यादी मी तुला देईन)
वादविवाद करताना समोरचा चु आहे, म्हणजे चुकीचा आहे असे समजूनच आपले मत मांडावे. अधूनमधून कविता, शेरोशायरी मारायला हरकत नाही. (पण स्वत:च्या कविता पोष्ट करू नकोस. ग्रुपमधून हाकलपट्टी होण्याची शक्यता वाढेल 😂)
वरिल सल्ल्यावर अंमल केल्यास एक महिन्यातच तू व्हाट्सअप वर कोणीतरी होशील. 💐माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे त्या तुला कधी दिसणार नाहित... पण आहेत.
तुमची प्रतिक्रिया लिहा