गणेश आमचा गणा. गणेश नाव एका दृष्टीने शोभतंय त्याला. कारण त्याच्याकडे तुंदिलतनु अतिसाजरी नाही पण बुद्धिमत्ता आहे. मित्रांना मिश्कीलपणे शाब्दिक चिमटे काढण्यासाठी गणा अधूनमधून ग्रुपवर प्रकट होत असतो.😉 गणेशचा स्वभाव साधा-सरळ, नेमस्त आणि सदगृहस्थ टाईपचं व्यक्तिमत्व! शाळेत शैक्षणिक, कला, क्रिडा (किडा) इ. कुठल्याच प्रकारात गणेशने दखल घेण्याजोगी कामगिरी केली नव्हती. अधूनमधून अभ्यासात चमक दाखवत असे.
वरील फोटोमध्ये गळ्यात टांगलेल्या कॅमेरावरून तो फोटोग्राफर आहे असा गैरसमज करून घेऊ नका. गणेश इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. हे मला अलिकडेच समजलं. ⚡ शॉकच बसला! म्हणजे तो इंजिनीअर आहे म्हणून नाही तर 'इलेक्ट्रिकल' मध्ये आहे म्हणून. माझ्या अगाध ज्ञानानुसार इलेक्ट्रिक मध्ये अंतिम पदवी म्हणजे वायरमन. (असो! आता ज्ञानात भर पडली 😊)
गणेशच गायन ही अजून एक अचंबित करणारी गोष्ट. शालेय कारकिर्दीत त्याने कधी गायनाचा प्रयत्न केल्याचे मला तरी स्मरतं नाही. आपल्या ग्रुपमुळे त्याचे गायन ऐकता आले. खुपच चांगला गायक आहे. मुकेशची गाणी तर अप्रतिम गातो. 👍
गणेशसोबत शाळेत असतानाची जुजबी मैत्री आता दाट मैत्रीत रूपांतरित झाली आहे. अधूनमधून मला सल्ले (अर्थात मित्रत्वाचे) देण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. नुसताचं बुवा असलेला गणेश काहि महिन्यांपूर्वी सासरेबुवा झालेला आहे. गणेश, वेळात वेळ काढून गायन आणि लेखनावर लक्ष दे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
गणेश2 years ago
अभिजीत 2 years ago
अनिल2 years ago
विकास2 years ago
विजय2 years ago
नरेश2 years ago
संजय के2 years ago
दयानंद2 years ago
अनिता2 years ago
समीर2 years ago
अवधूत2 years ago
प्रशांत2 years ago
सुनील2 years ago
रवीदत्त2 years ago
प्रदीप2 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा