१७ मे २०२०
सोबर गब्बर..उत्तरार्ध
- गणेश शेट्येसरकारने डरोना चा मुकाबला करण्यासाठी एक नवीन शब्द बाजारात आणला. (म्हणजे शब्द जुनाच होता पण त्यातून नवीन अर्थ निघत होता.) ठाकूरने रामलालला त्याचा अर्थ विचारला. नोकरी जाण्याच्या भीतीने रामसिंगने अनभिज्ञता दर्शवली. पण त्याने ठाकूरला ज्ञानी गब्बर यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. गब्बर आता एलआयसी मध्ये गुंतवणूक करून सुखाचे आयुष्य जगात आहे असेही त्याने ठाकूरला सांगितले. झाले. आदर आणखी वाढला.
ठाकूरने त्वरित प्रशासनाकडून पास मिळवला व तो गब्बर याला भेटण्यासाठी मार्गस्थ झाला. गब्बर आणि ठाकुर भेटल्यानंतर पुढील संवाद घडला...
गब्बर काय ठाकुर, कसे येणे केलेत ?
ठाकुर: भो* गब्बर, (भो हे संस्कृत भाषेतील, अहो असे आदराने आहे !). डरोना येणार हे तुम्हाला दूरदृष्टीने कळाले होते. म्हणूनच हात तोडून तुम्ही मला मदतच केली. आता अजून अशा प्रकारचा नवीन व्हायरस पुढे येणार असल्यास तुम्ही माझे पाय अथवा इतर योग्य तो अवयव तोडू शकाल का ?
गब्बर (नम्रतेने) नाही मित्रा... असा पुढे येणारा आजार फक्त वृत्तवाहिन्यांना माहित असतो. तसे त्या नंतर कबुल पण करतात. त्या सांगतात त्या प्रमाणे तितके लोक आजारी पण पडतात.
ठाकुर: (आदर थोडा कमी), बरं... त्या नवीन बाजारात आलेल्या शब्दाबद्दल तुम्ही काही सांगाल का ?
गब्बर त्या शब्दावर आता अनेक कारखान्यात विश्लेषण चालू आहे. त्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही.
ठाकुर: (च्यायला), मग आता मी काय करू ?
गब्बर: (च्यायला) तू तुझे बघ...
ठाकुर: (पेट्रोल आणि टोल चे पैसे वाया), इतक्या लांबून आलो तर काहीतरी सांगा..
गब्बर: मी एक गाणे बोलणार (!) आहे. फुकट आहे. म्हणजे admin यांनी मला जुने हसण्याचे आणि इतर डायलॉग्ज यांचा साठा संपल्यामुळे नवीन मागणी नोंदवली होती. पण आता ते काम मी करत नाही. म्हणून मी गाऊन पाठवत आहे. त्यानंतर ते पुन्हा मला कोणतीच विनंती करणार नाहीत...
ठाकुर: चालेल. मी सुध्दा ते ऐकतो. ( बिचारा).
तर, गब्बरचे गाणे तुम्हालासुद्धा पाठवत आहे. ऐका (बिचारे !)...
You can Like, Share & Comment
तुमची प्रतिक्रिया लिहा