बघता बघता मधली सुट्टी आज वर्षाची झाली. (वर्षाची म्हणजे one year) सर्वप्रथम सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!💐 एकमेकांना एवढे दिवस सहन केल्याबद्दल 😘. तशी सर्व मित्रमैत्रिणींची साथ होतीच पण विशेष आभार रवीदत्त व नीना यांचे, ज्यांनी पुढाकार घेऊन हा ग्रुप ( समूह किंवा टोळीसुद्धा म्हणू शकता ) स्थापन केला. सुनीलने प्रयत्नपूर्वक आमची फक्त मुलांची टोळी बनवली होती व ती आम्ही सर्व गुण्यागोविंदाने चालवीत आहोत, त्याचीच ही पुढील आवृत्ती. 😍
अधूनमधून कन्याशाळा व मुलांचा एकत्रित ग्रुप असावा अशी चर्चा व्हायची तिकडे मुलांच्या ग्रुपवर. (पण मांजरींच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? 😂) म्हणजे फक्त चर्चाच व्हायची पुढे काही नाही. अशातच एके दिवशी रवीदत्तचा Audio Message मुलांच्या ग्रुपवर आला. त्याने एकत्रित नवीन टोळी बनवण्यासाठी सर्व मित्रांची रितसर परवानगी घेतली. अर्थात नकार देण्यासारखे काही नव्हतं. एकमताने मंजुरी!! निदान आजी-आजोबा होण्यापूर्वी तरी ग्रुप स्थापन झाला. कोणी तरुण आजी-आजोबा आहेत का ग्रुपमध्ये? 😉
लोकशाही असल्याने ग्रुपचे नाव काय असावे? याचीही चर्चा झाली. मी सुचविलेले मधली सुट्टी हे नाव निवडण्यात आले. (तेवढाच भाव खाऊन घेतो) दोन अधिकृत टोळीप्रमुख म्हणजे एडमिन म्हणून नीना व महेश यांची नेमणूक झाली.
बारसं झाल्यावर हळूहळू ग्रुप बाळसं धरू लागला. काहीजण ग्रुप सोडून गेले, काही नवीन आले. पण बरेच सदस्य मधल्या सुट्टीत रमले. एकमेकांचा अंदाज घेण्यात थोडा कालावधी गेला पण आता रूळलेयंत सगळे! काही जण रोज post करतात, काही प्रासंगिक, काही फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी डोकावतात. काही वाचक फक्त वाचतात. तरीही प्रत्येकजण तेवढाच महत्त्वाचा कारण मैत्रीच्या गोफात गुंफलेले सारे मोती समान मूल्याचे असतात. 😍
विविध क्षेत्रातले विद्वान व विदुषी समूहात असल्याने मधल्या सुट्टीत ज्ञानगंगा अखंड वहात असते. पण मधल्या सुट्टीचा POSTer Boy कोण असेल, तर तो संजय के. (आमचे संख्याशास्त्रज्ञ गणेश यांच्या माहितीनुसार संजय के. ने वर्षभरात १२८३ मेसेजेस् पोष्ट केलेत. त्यातले त्याने स्वत: किती वाचलेयतं त्यालाच ठाऊक! 😀)
ग्रुपमध्ये शिक्षक, इंजिनिअर्स, डॉक्टर अशी विविधता आहे. पण ग्रुप चालवण्याची मुख्य जबाबदारी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवरच आहे. डॉक्टरांबद्दल काय सांगावे! कन्याशाळेत तीन-तीन डॉक्टर आहेत पण आजारी पडलो तर कंपाऊंडरच कामाला येतो. (नाही म्हणायला दात तेवढे सुरक्षित आहेत एका डॉक्टरमुळे 😁) ग्रुपमधील शिक्षकांबद्दल बोलावे, तर बरेचसे सदस्य कोकणातले असल्याने, शिक्षकपण त्यांना जास्त काही शिकवू शकत नाहीत. असो!
मुलांसाठी मधल्या सुट्टीत मेसेज पोष्ट करताना थोडी कसरत असते. फक्त मुलांच्या ग्रुपवर पोष्ट करताना कोणतेच बंधन नसते. अगदी डोळे झाकून कोणताही मेसेज पोष्ट करावा 😜 पण इथे डोळसपणे पोष्ट करावे लागते. नाहीतर म्हणतात ना, 'फट् म्हणता ब्रह्महत्या' तसं 'पोष्ट टाकून आत्मघात'. तरीही सर्वांनी आतापर्यंत जसे तारतम्य बाळगून एकमेकांचे ज्ञान वृद्धिंगत केलेत, तोच वसा पुढेही चालू राहू द्यावा!
शाळेत असताना मधल्या सुट्टीचा कालावधी मर्यादित होता. पण ही मधली सुट्टी अमर्याद आहे. येथे यावे क्षणभर रमावे. ताजेतवाने होऊन नेहमीचे जीवन जगावे. ना स्थळाचे बंधन ना काळाचे! कधीही या मधली सुट्टी आपलीच आहे. (मुलांच्या ग्रुपवर तर पोष्टचेसुद्धा बंधन नाही. मज्जाच मज्जा! 😂)
पुन्हा एकदा मधल्या सुट्टीत बागडणाऱ्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनींचे प्रथम वर्धापनदिनी अभिनंदन!!!💐
दयानंद3 years ago
वैशाली3 years ago
निकेता3 years ago
विनायक5 years ago
रविदत्त5 years ago
विनय5 years ago
अवधूत5 years ago
विलास के.5 years ago
गणेश5 years ago
प्रशांत5 years ago
अभिजित5 years ago
प्रदीप5 years ago
सुनील5 years ago
नीना5 years ago
शैलेश डी.5 years ago
संजय डी.5 years ago
विलास पी.5 years ago
विकास सी.5 years ago
विनोद5 years ago
दीपक5 years ago
नरेश5 years ago
प्रसाद5 years ago
विजय5 years ago
संतोष एम.5 years ago
सुनीता5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा