आज जवळपास ३०-३५ वर्षांनंतरसुद्धा समाजमाध्यमांच्या कृपेने आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. कधी-कधी प्रत्यक्ष भेटीगाठी होतात. शाळेतल्या आठवणींचा स्मृतिगंध दरवळतो आणि मन प्रफुल्लित होते. कदाचित तुम्हाला तुमच्या शाळेतील दिवसांची आठवण होईल आणि मन पुन्हा एकदा बालपणात रमून जाईल!
आमचं बालपण साधारण १९७५ ते १९८५ या काळातलं. त्यावेळी मध्य मुंबईतील गिरणगाव-काळाचौकी परिसरातील शिवाजी विद्यालय या नामांकित शाळेत जाणारे आम्ही सारे. संदर्भासाठी म्हणून सांगतो आमच्या शाळेत प्राथमिक शिक्षण हे सहशिक्षण या प्रकारात मोडणारे. त्यानंतर मात्र दहावीपर्यंत कन्याशाळा हा स्वतंत्र विभाग
आमच्या शालेय मित्र-मैत्रिणींच्या गतकाळातील आठवणींसोबतच वर्तमानात साजरे होणारे सोहळे, पिकनिक, स्नेहसंमेलनं यांचा वृत्तांतदेखील या विभागात वाचता येईल.