यजमान (होस्ट) गणेश, फक्त मुलांच्या शिवाजी ८५ ह्या ग्रुपसाठी आयोजित केलेल्या सभेसाठी धन्यवाद! उपस्थित मित्रांचे आभार. अनुपस्थित मित्रसुद्धा आले असते तर अजून बरं वाटलं असतं.
कालच्या सभेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुक्तसंवाद. मधल्या सुट्टीच्या मिटींगमध्ये एक अनामिक दडपण जाणवतं ते इथे नव्हतं. टेन्शन म्हणजे बैंजो बोलताना चुकून एखादा वावगा शब्द गेला तर बैंचौवरच उभं राहायला लागणार. इथे मधल्या सुट्टीसारखा औपचारीकपणा नाही. इथे कोणी चुकला तर आपण म्हणतो, "काय च्युxxगिरी लावलीय?" पण तिकडे म्हणावं लागतं "काय चिऊताईगिरी लावलीय?" त्यामुळे तिकडे बरेचजण मुक्यानेच रहाणं पसंत करतात. असो!
सभेची सुरुवात नेहमीप्रमाणे टिंगलटवाळीने झाली. नितीन, प्रकाशसारखे मधल्या सुट्टीत न दिसणारे काही तारे उगवले होते. गेल्या मिटिंगला हेडफोनशी दोन हात करणारा सुरेश निसर्गाच्या सान्निध्यात अर्ध-नैसर्गिक रूपात प्रकट झाला. ह्यावेळी त्याचा आवाजही ऐकू आला. शालेय जीवनात प्रभूचा अभ्यास पक्का होण्यासाठी त्याने कसा हातभार लावला ते गुपित उघडं केलं. (तरीच! आत्ता कळलं, विलास प्रभू एवढा हुशार कसा झाला ते.) अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आपल्या वर्गातल्या तिन्ही टॉपर्सची नावं वि ने सुरू होतात. विनायक, विलास, विनय. थ्री व्हिज्! जसे क्रिकेटमधील प्रसिद्ध थ्री डब्ल्यूज्
बैठक अनौपचारिक असल्याने विषयांना बंधन नव्हतं. पण सुनीलला एवढं दडपण होतं मिटींगचं , त्याने स्वत:ला कारमध्येच क्वारंटाईन करून घेतलं होतं तीन तासांसाठी.
कारसे आनेवाले हमेशा देरसे आते है असा दिवार सिनेमात डायलॉग आहे
पण आमच्याकडे कारमधला सुनील वेळेवर आला पण बिन-कारवाला प्रसाद उशीरा आला नेहमीप्रमाणे.
मधली सुट्टी मिटिंगमध्ये मास्क लावून शोबाजी करणारा अभिजित इकडे चक्क उघड्या चेहऱ्याने आला होता. समीर पाटीलचं काय झालं माहित नाही! म्हणजे तो होतापण आणि नव्हतापण. मला वाटतं पाटील बहुधा लावणी वगैरे पहायला मिळेल ह्या अपेक्षेने आले असावेत, पण इथे बिनबायांचा तमाशा त्यामुळे दौलतजादा न करता नुसतेच बसून होते. रविदत्त तर खुललाचं होता मनाने. (आणि कपड्यांनीही! बिनबाह्याचं टिशर्ट घालून आला होता.) म्हणजे किती मनमोकळं वातावरण होत बघा. नावाप्रमाणे विलास पी. ने जी गोष्ट करायला पाहिजे होती ती विलास के ने केली. चिअर्स!!! काय हा दैवदुर्विलास.
- क्रमश: पुढील भाग
गणेश5 years ago
सुनील5 years ago
विनायक5 years ago
रविदत्त5 years ago
प्रकाश5 years ago
अभिजित5 years ago
अवधूत5 years ago
प्रशांत5 years ago
अभय5 years ago
वसंत5 years ago
विजय5 years ago
विलास पी.5 years ago
विलास के.5 years ago
संजय के.5 years ago
अनिल5 years ago
समीर5 years ago
नरेश5 years ago
नितीन5 years ago
प्रसाद5 years ago
विनय5 years ago
विकास सी.5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा