पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन मित्रांनी देवदत्त व्यायामशाळेत प्रवेश घेतला. पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजताच उत्साहात व्यायामशाळेत पदार्पण केले. व्यायामपटुंची बरीच गर्दी होती. त्यामानाने जागा फारच कमी होती. साधारणतः पूर्वी व्यायामशाळा म्हणजे एक छोटीशी खोली असे, ज्यामधे व्यायामाच सामान असे. आताच्या सुसज्ज वातानुकूलित जिमशी त्याची तुलना नाही होऊ शकतं!
पहिलाच दिवस असल्याने वस्तादांनी जुजबी माहिती दिली व सुरूवात करण्यास सांगितली. वस्ताद म्हणजे हल्लीचे जिम इंस्ट्रक्टर. आजूबाजूला बरेचसे बलदंड तरूण जोरदार व्यायाम करत होते. जिमचा ड्रेसकोड वगैरे प्रकार नव्हता, सगळे उघड्या अंगाने व्यायाम करत होते. त्यांची पीळदार शरीरयष्टी पाहता, आपण आपल्या अंगातील शर्ट काढून अस्थिपंजराचे प्रदर्शन करावे की करू नये? ह्या विचारातचं दहा मिनिटे घालवली. कसाबसा थातुरमातूर व्यायाम करून पंधरा मिनिटांनी तिथून सटकलो. 🏃🏻
एकणूचं हे अवघड काम आहे याची जाणीव झाली. आठवडाभर कशीबशी उपस्थिती लावली, नंतर आम्हाला शोध लागला साडे-तीन चार वाजता गर्दी कमी असते. मग वस्तादांना सांगून ती वेळ घेतली. म्हणजे अगदी व्यायामशाळा उघडायलाच जायचो आम्ही. एवढ्या लवकर वस्ताद पण नाही यायचे 🤦 आम्ही चौघचं असायचो. म्हणजे आम्ही तिघे आणि हनुमान (भिंतीवरच्या तसबिरीतला). आता आम्ही जरा मनमोकळेपणाने व्यायाम करू लागलो. म्हणजे व्यायाम थोडा आणि न झालेली बिल्ड आरशात बघणचं जास्त व्हायचं.
बिल्डिंगमधल्या इतर मित्रांना आमचा व्यायाम हा एक टिंगलीचा विषय मिळालेला होता. पंधरा दिवसांत काहीच फरक पडला नव्हता (व तो पडतही नाही त्यासाठी वेळ द्यावा लागतो). थोडीशी चाल मात्र बदलली होती. जर तुमच निरीक्षण चांगल असेल तर तुमच्या लक्षात येईल, जे नवशिके हौशी व्यायामपटू असतात ते उगाचंच भरदार नसलेली छाती पुढे काढून, बगलेत लिंबू ठेवल्यासारखे हात बाजूला करून चालतातं. जणू काही हात नसून ते पंखच असावेत (जोराची हवा आली तर उडूनचं जातील) 😂
दिवसागणिक उत्साह ओसरत होता. बिल्ड काही होत नव्हती. कधीकधी तर फोटोतला हनुमानदेखील आमच्याकडे बघून हसतोय अस वाटायचं. 'मैने प्यार किया' चा अंमलही हळूहळू कमी झाला. बघता बघता (आरशात) व्यायामशाळेतला एक महिना संपला. आरशातल माझं प्रतिबिंब एक महिन्याच्या जबरदस्त(?) व्यायामानंतरसुद्धा तसच होतं!
महिन्याभरातच व्यायामाच भूत उतरलं. त्यानंतर इतक्या वर्षात आजतागायत मी कधीही व्यायामशाळेत गेलो नाही. अगदी ऑफिसमध्ये वातानुकूलित जिम असतानासुद्धा. व्यायामाला दुरूनच रामराम.
उदय 3 years ago
शेखर3 years ago
रोहित3 years ago
भाग्यश्री3 years ago
विजय3 years ago
संजय डी.3 years ago
अवधूत3 years ago
विलास पी.3 years ago
अभय3 years ago
संजय के.3 years ago
नरेश3 years ago
रविदत्त3 years ago
राजश्री3 years ago
गीता3 years ago
विनायक3 years ago
नीना3 years ago
दयानंद3 years ago
वर्षा एस.3 years ago
विलास के.3 years ago
प्रदीप3 years ago
नेत्रा3 years ago
वैशाली3 years ago
दिलीप3 years ago
मनीषा3 years ago
अनिता3 years ago
प्रसाद3 years ago
प्रशांत3 years ago
शैका3 years ago
अनिल3 years ago
समीर3 years ago
वर्षा डब्लू.3 years ago
संध्या3 years ago
चारू3 years ago
पल्लवी3 years ago
सुमित3 years ago
किसन3 years ago
वंदना3 years ago
महेश बी.3 years ago
अजित3 years ago
प्रणव3 years ago
प्रथमेश3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा