"आलास लेकरा! कसा आहेस?" म्हणजे त्याच झालं अस की सरकारने प्रार्थनास्थळे खुली केली आणि देवदर्शनासाठी मंदिरात गेलो तेव्हा मला हा आवाज ऐकू आला.
"मी अंतर्ज्ञानी आहे. मी जाणतो तुझी माझ्यावरील श्रद्धा! पण त्यासाठी एवढ्या लगबगीने भेटीची गरज नव्हती. सरकारने त्यांच काम केलं, परंतु आता जबाबदारीने वागणं तुझ काम आहे. मी चराचरात सामावलेलो आहे. माझ्या लेकरांची मला काळजी आहे, त्यासाठी तू माझ्या पायाशी बसून रहाण्याची गरज नाही. इतक्या दिवसांच्या विरहानंतर 'भेटि लागी जीवा लागलीसे आस'... अशी तुझ्या मनाची अवस्था होणे स्वाभाविक आहे, परंतु लेकरा अजून काही दिवसांनी सारे सुरळीत होईलच तेव्हा आपण पूर्वीसारखे भेटूच!
आता मात्र सारासार विचारांची गरज आहे. घार उडे आकाशी तिचे चित्त पिलापाशी, तसा मी नेहमीच माझ्या लेकरांच्या पाठीशी असतो. निर्मळ मनाने तुझ्या घरातून जरी प्रार्थना केलीस तरी ती माझ्यापर्यंत पोहचेल. दिखाव्यासाठी भक्ती करू नकोस, मन:शांतीसाठी कर! आपल्यासोबत इतरांचीही काळजी घे."
प्रसाद4 years ago
संजय डी.4 years ago
विनायक4 years ago
अभिजित4 years ago
रविदत्त4 years ago
सुनील4 years ago
गीता4 years ago
प्रदीप4 years ago
प्रशांत4 years ago
शैलेश के.4 years ago
अनिल4 years ago
नरेश4 years ago
दयानंद4 years ago
शैलेश डी.4 years ago
प्रकाश4 years ago
दिगंबर4 years ago
संजय के.4 years ago
दयानंद4 years ago
राजश्री4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा