आज काय दिनविशेष ? हे त्रस्त समंधांनो, हम ७ साथ है. आज तब्बल सात वर्षे पूर्ण झाली शिवाजी-८५ ह्या आपल्या समूहाला (म्हणजे मराठीत ग्रुपला ) अर्थातच पहिले धन्यवाद सुनिलला, त्यांनतर आपणा सर्वांना, जे एवढ्या चिकाटीने चिकटून राहिले एकमेकांना. अगदी सोशल डिस्टन्सिंगच्या काळातसुद्धा.
आपण शाळेत एका वर्गात शिकत होतो. शिक्षकांच्या / पालकांच्या धाकाने एका वर्गात बसत होतो. काहीजण चक्क शिकायला आवडतं म्हणून शिकत होते. शालांत परीक्षेनंतर मात्र प्रत्येकाने आपापला पंथ निवडला. बऱ्याच वर्षांनंतर हे पांथस्थ व्हाटसअप ग्रुपच्या सहाय्याने एकत्र आले. म्हणजे एक गुरूकुलच स्थापन झाले म्हणा ना. जिथे सगळेच कुलगुरू 😎
सुरूवातीला मोहब्बतेंमधल्या अमिताभसारखं सुनीलने आपल्याला सांगितलं
"परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन इन तीन स्तंभों पर ये अपना व्हॅट्सएप गुरुकुल खडा है, ह्यांऽय" ...
पण आपण काय त्या खांबांना घंटा महत्त्व न देता आपापली मैत्रीची मोहब्बतें चालु ठेवली, तब्बल गेली सात वर्ष ...! आज सुनीलपण बसलाय 🎻 व्हायोलिन वाजवत आपल्या नावाने.
शाळेत सर्वांना एकच अभ्यासक्रम होता. पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत प्रत्येकाचा स्वत:चा अभ्यासक्रम! एकमेकांचे अज्ञान दूर करण्याच्या प्रामाणिक भावनेने सात वर्षात बरीच चर्चासत्रे झाली. (काहिजण त्याला भांडण, वादविवाद असही म्हणतात. असो! ) तर आपण सर्वज्ञानी झालो, असं वाटतं असतानाच कोणीतरी आपलं अज्ञान दूर करतो.😍 काही डावीकडून, काही उजवीकडून तर काही मधूनच चालणारे असे आपण ज्ञानपिपासू वाटसरू.
फक्त शैक्षणिक नाही तर इतर प्रांत जसे कला, क्रिडा यातही मित्रांनी आपली चुणूक दाखवली ग्रुपवर. हां आता ग्रुपवर क्रिडानैपुण्य कसं दाखवणार? मग काहींनी किडा करण्याचा मार्ग निवडला. एक वेगळी मज्जा! एक वेगळीच किडेगिरी.
काही का असेना, आजही आपण ३९ जण एकत्र टिकून आहोत यातच आपले यश सामावलेले आहे. तुमच्या सहकार्याने संतूवाण्याचे दुकान सुरू आहे, हे ही नसे थोडके! मला वाटतं ह्या सात वर्षांत आपल्या मनात जर काही हेवेदावे, किंतु-परंतु साठले असतील तर त्याचा निचरा करून टाकू आणि पुनश्च हरी ओम म्हणू. 🙏
धन्यवाद मित्रांनो !!!
गणेश5 years ago
विनायक5 years ago
संजय डी.5 years ago
प्रशांत5 years ago
अवधूत5 years ago
विलास के.5 years ago
रविदत्त5 years ago
महेश5 years ago
दीपक5 years ago
अभिजित5 years ago
दयानंद5 years ago
वसंत5 years ago
समीर5 years ago
विजय5 years ago
प्रसाद5 years ago
संतोष एम.5 years ago
संजय के.5 years ago
विनोद5 years ago
अभय5 years ago
दिलीप5 years ago
नितीन5 years ago
विलास पी.5 years ago
सुनील5 years ago
नरेश5 years ago
अनिल5 years ago
नितीन5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा