स्नेहसंमेलन संपताना अभयने रविदत्तचा एक निरोप सांगितला, "शक्य झाल्यास घरी जाताना मुलुंड पोलीस स्टेशनला रवीची भेट घ्या". खरं म्हणजे एखादा कार्यक्रम संपला असं जाहीर झाला कि प्रत्येकाला घरी जायची घाई होते. वेगवेगळे ग्रुप बनवून घरी जायची तयारी झालीसुध्दा ! परंतु गंमत म्हणजे थोड्याफार फरकाने सर्व ग्रुप मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. मित्रांना रवीचा प्रेमळ आग्रह मोडता आला नाही. (पोलिसांनी आपल्याला घेऊन जाण्यापेक्षा आपण पोलीस स्टेशनला गेलेलं बरं 😃)
सर्वात आधी आमचा ग्रुप पोहचला कारण आमचा म्होरक्या अवधूत होता. दबकतच सावंतसाहेबांच्या प्रशस्त केबिनचा दरवाजा उघडला. वर्दीमधले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत एकदम भारी वाटत होते. पोलीस स्टेशनमध्ये फक्त गुन्हेगार आणि पोलिसंच जातात असा समज असल्याने आम्ही सुरुवातीला जरा दडपणाखालीच होतो (अवधूत मात्र सराईतासारखा वावरत होता 😘) हळूहळू मित्रमैत्रिणीची संख्या वाढली आणि केबिन भरून गेली. केबिनमध्ये एका मोठ्या बोर्डवर गुन्ह्यांचा तपशील होता. तो वाचल्यावर ज्ञानातं थोडी भर पडली. म्हणजे दरोडा टाकणे हा गुन्हा असतो हे माहित होतं पण दरोड्याची तयारी हासुद्धा एक गुन्हा आहे. (आम्ही तयारी न करताच परीक्षेला बसणारे 😍)
श्री. संभाजी जाधव (मुलुंड पोलीस जनसंपर्क विभाग) ज्यांनी सकाळी आपल्या स्नेहसंमेलनाला सदिच्छा भेट दिली होती ते चहाचा फारच आग्रह करत होते. सरकारी चहा, एकदा पिऊन तर पहा ! पण चहा सरकारी असल्याने प्यावा कि न प्यावा अशी आमची व्दिधा मन:स्थिती होती. वेळेअभावी आम्ही चहाचा बेत रहित केला. (पण श्री. जाधव आणि न प्यायलेला सरकारी चहा कायम लक्षात राहील)
रविदत्ताच्या कामाचा व्याप बघून पटापट फोटोसेशन उरकून घेतलं. आपल्याला फक्त आपल्या घरची कायदा आणि सुव्यवस्था बघायची असते. रविदत्तकडे संपूर्ण मुलुंड पश्चिमची जबाबदारी! त्यामळे त्याचा जास्त वेळ घेणं सयुक्तिक ठरल नसतं. व.पो.नि. रविदत्त याला आम्हां सर्वांतर्फे कडक सॅल्यूट अर्थात मित्रप्रेमाचा 🙏
अभिजीत3 years ago
नरेश3 years ago
वैशाली3 years ago
संजय के.3 years ago
अवधूत3 years ago
सुनील3 years ago
समीर3 years ago
मनीषा3 years ago
संजय डी.3 years ago
विलास के.3 years ago
अभय3 years ago
सुनीता3 years ago
गणेश3 years ago
दयानंद3 years ago
प्रसाद3 years ago
दिलीप3 years ago
प्रशांत3 years ago
कीर्ती3 years ago
वर्षा डब्लू.3 years ago
रविदत्त3 years ago
वसंत3 years ago
गीता3 years ago
राजश्री3 years ago
प्रदीप3 years ago
अनिल3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा