विलास प्रभू, ज्याला खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत म्हणता येईल असा आपला मित्र. (तसे हुशार खूप आहेत आपल्यात) आणि महत्त्वाचं म्हणजे विलास हा व्हाट्सअप युनिव्हर्सिटी व सोशल मीडिया येण्यापूर्वीपासून हुशार आहे.
इयत्ता सातवीला आपल्या वर्गातील ज्या त्रिमूर्तींना स्कॉलरशिप मिळाली त्यातील हा एक. (बाकी दोन मूर्ती - पुणे आणि जालना येथे आहेत.) त्यानंतरही विलासला कोणतीतरी टॅलेंट सर्च ची स्कॉलरशिप मिळाली. (मीपण त्या परीक्षेला बसलो होतो पण माझी प्रज्ञा मोजणे त्या परीक्षेला जमलं नाही). शाळेत असताना आपण स्कॉलर दिसावे म्हणून विलास चष्मा लावत असावा अशी मला दाट शंका आहे.
प्रभूंचा मुक्काम सध्या विलायतेत आहे, तरीही ग्रुपवर लक्ष ठेऊन असतात. (सौदि अरेबियात असता तर उंटावरून शेळ्या हाकतो असं म्हणता आलं असतं). विलासला वाचनाची जबरदस्त आवड. वानगीदाखल सांगायचं तर शाळेत असताना (नववी - दहावी) मधल्या सुट्टीत जो थोडासा वेळ मिळे त्या वेळात तो माझ्या घरी येई, पटापट लोकसत्ता वाचत असे, तसेच शेजाऱ्यांकडून आणलेला म.टा.हि वाचे. विलासकडे नुसतं वाचनवेडं नाही तर त्याबरोबर अफलातून स्मरणशक्तीची दैवी देणगी आहे (कदाचित प्रभू आडनावामुळे देवाने त्याला बुद्धी देताना हात थोडा सैल सोडला असावा).
क्रिकेट खेळण्यात पारंगत नसला तरी क्रिकेटसचे रेकॉर्डस् तोंडपाठ. क्रिकेटबरोबरच त्याच्या मेंदूत सामान्य ज्ञानाचा खूप जीबी डेटा स्टोअर केलेला आहे. प्रगल्भ समाज आणि समाजभान असणारे राजकारणी असावेत, अशा काहीशा अवास्तव अपेक्षा असतात त्याच्या. त्यानुसार त्याच्या विचारांची मांडणी असते. त्यामुळे कधीकधी त्याचा डावीकडे तोल जातोय असे भासते. काहिही असले तरी त्याच्या वागण्यात कधी विद्वत्तेचा गर्व दिसून येत नाही. (किंबहुना आम्ही त्याला दाखवू देत नाही. आम्ही कोणालाही आमच्या पातळीवर आणण्यात वाकबगार आहोत. असो!)
विलास, एक विनंती आहे, तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून इंग्लंडच्या राणीकडून आपला कोहिनूर हिरा मिळतो काय बघं ! वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!!
विनायक4 years ago
रविदत्त4 years ago
राजश्री4 years ago
शैका4 years ago
संजय के.4 years ago
नीना4 years ago
विलास पी.4 years ago
दयानंद4 years ago
महेश4 years ago
सुनील4 years ago
समीर4 years ago
वर्षा एस.4 years ago
प्रदीप4 years ago
अवधूत4 years ago
प्रसाद4 years ago
प्रशांत4 years ago
विनय4 years ago
विलास के.4 years ago
दिगंबर4 years ago
अभिजित4 years ago
विनोद4 years ago
संतोष एम.4 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा