१२ मे २०२०

थोडसं मनातलं...

संदर्भ: व्हाट्सअप ग्रुपवर कस वागावं ह्याविषयी संतूवाण्याने मित्रांना दिलेले प्रवचन

मित्रौं वय वाढत तसं ऐकण्याची शक्ती कमी होते. म्हणून दुसऱ्याचं ऐकूनच न घेणे चुकीचं आहे. आज तुम्ही सारे पन्नाशीत पोहचलायत (मी थोडा लहान आहे..डोक्याने). शाळेत असताना प्रत्येकजण अभ्यासात हुशार नसेल पण आज प्रत्येकाला आयुष्याने काही धडे दिले आहेत. जीवनाच्या अनुभवातून प्रत्त्येकजण तावून-सुलाखून निघालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला अगदी खूप नाही पण पोटा-पाण्यापुरती अक्कल आलेली आहे.

आपल्या समूहाची स्थापना प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या उद्देशाने झाली आहे असा माझा तर्क आहे. पण जर मनानेच आपण एकेमेकांपासून दूर गेलो तर काय फायदा? आपला ग्रुप म्हणजे आनंदाच दुकान असल पाहिजे. एकमेकांना आनंद देणे आणि जमलं तर एकमेकांची दुःख समजून घेणे. अगदीच मिळमिळीत वातावरण झालं तर कधी कधी एकमेकांना चवीपुरत्या शिव्या देणे. ग्रुपचा एक अर्थ आहे एकत्र येणे.

ज्याप्रमाणे आपण अनावश्यक गोष्टी मोबाइलमधून डिलीट करतो त्याप्रमाणे मनातूनपण डिलिट करता आल्या पाहिजेत म्हणजे मनःस्ताप होत नाही. लगेच जमणार नाही पण शिकावं लागेल. एखाद्याच्या फॉरवर्ड्स /पोष्टवरून त्याच्याविषयी मत बनविणे टाळा. उदा.एखादा मित्र कायम अश्लील पोष्ट टाकत असेल तर असं समजू नये कि तो कायम विवस्त्र बसलेला असेल 🤪. कोणी पुण्याहून पोष्ट करत असेल तर तो सर्वज्ञ असेल किंवा कोणी अध्यात्मिक पोष्ट टाकत असेल तर तो सात्विक साधू असेल. (असेलही!)

मान्य आहे कधी कधी आपण अगदीच बालिश वागतो किंवा बालवाडीतले विनोद करतो. पण ठिक आहे ना, ह्या आभासी जगात थोड लहान व्हायला काय हरकत आहे? एरव्ही बाहेरच्या जगात आपण समजदार(?) असतोच ना! राजकारणाचं म्हणाल तर कुणी मोदी घ्या, कुणी पवार घ्या , ठाकरे घ्या... पण त्यांच्यासाठी एकमेकांना घेऊ नका रे ! प्रत्येकाने माझ्याचं पक्षात यावे हा दुराग्रह नको. आपल्याला जे काय समजत, कळतं ते पोष्ट केल्यावर, समोरच्याने ते मान्य केलेच पाहिजे हा अट्टाहास नको.

समर्थ रामदासांनी म्हटलचं आहे,
आपणासी जे जे ठावे ते ते
दुसऱ्यासी सांगावे
शहाणे करून सोडावे
सकळ जन...

टिप: कोणी शहाणा होत नसेल तर त्यांस सोडूनी द्यावे. 🙏 ||पांडुरंग हरी||
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

काही विशेष

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

विनायक5 years ago

Simply great. किती छान सांगितलं.

किसन5 years ago

अफाट भाषाप्रभुत्व व प्रतिभा शैली... संतोष , संजय 🙏🙏🙏🙏

प्रदीप5 years ago

सडेतोड👍👍 तेवढंच परफेक्ट ही👌👌जिते रहो.. दोस्त लिखते रहो..

संजय डी.5 years ago

संतुवाण्याच्या आनंदाच्या दुकानातील आम्ही गिऱ्हाईकं....
विवस्त्र असो की सात्त्विक
अज्ञ असो अथवा सर्वज्ञ
सर्वांनांच एका मापात तोलणार
एकच भाव लावणार...
जे मनात तेच ओठात
जे पोटात तेच कागदावर
सगळ्यांना ठोक भावात
सरसकट पुडीत गुंडाळणार...
दुकानात आलात आनंदाच्या
गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या
समजदार जे जगाच्या बाजारात
त्यांनाही शहाणे करणार... 🙏

सुनील5 years ago

झकास 👌🏽👌🏽👌🏽

विलास पी.5 years ago

ब्येश्ट 👌🏼

अवधूत5 years ago

लेखणी चालवताना ती धरणारे हात किती शक्तीशाली आहेत हे त्या हातांना वळवणाऱ्या सुपिक भेजावरून ओळखले जाते. तू एखाद्या जन्मी नक्कीच एक निष्णात कुशल सर्जन असावास.😘😘😘

विजय5 years ago

सुंदर

संजय के.5 years ago

मस्त 👌👌

दीपक5 years ago

समजूतदार, अनुभवी👌👍

रविदत्त5 years ago

Group's Unwritten Manners 😄👍👌

विलास के.5 years ago

😘master piece

प्रकाश5 years ago

Well said.....👌🏻

विकास सी.5 years ago

जबरदस्त मित्रा!!!!👏👏👏👏

प्रसाद5 years ago

Perrrfect 👍🏻👍🏻👍🏻

समीर5 years ago

👍🏻👍🏻🙏एक लोहार कि👌🏻

विनोद5 years ago

वाह, चौतर्फी फलंदाजी!!

अभिजित5 years ago

बेश्ट..👌👌 तळटीप पण.

शैलेश के.5 years ago

वाह क्या बात है

दयानंद5 years ago

नेहमी प्रमाणे मस्तच....👌🏻👌🏻👌 तरी पण...🤔

वसंत5 years ago

खूप खूप छान संतुवाणी ❤️❤️❤️

महेश5 years ago

👌👌👌🙏🙏

नितीन5 years ago

👌👍

अनिल5 years ago

🙏🙏

नरेश5 years ago

👌👌🙏🙏
Read more in this section:
माझा भूत काळआटपाटनगर लोकशाहीदहावीचे ९० टक्केमालवणी गब्बरशुभेच्छांवर बोलू काहीओऽ शीटअपना टाईम आयेगा?९० टक्क्यांची नवलाईथोडसं मनातलं...काटा कमळात रूतलामंडळ आभारी आहेशाळेतला पाऊसकॉलेजमधला पाऊसमित्रास पत्रवरसंशोधनव्यायामाची शाळा - पूर्वार्धव्यायामाची शाळा - उत्तरार्धप्याक-प्याक बदक पळालाओळख-पाळखवाढदिवस सरप्राइजमनी पाऊस दाटलेलालेकुरे उदंड जाहली
Close Video ❌