आटपाट नगरात काल रात्री अघटीत घडल. कमलदलांत घड्याळाचा एक काटा बंदि झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत खरोखरच हातात कमळ आणि खिशाला एका काट्याच घड्याळ लावून गेल्यावेळेचाच राजा आटपाट नगरात पुन्हा आला. अगदी पहाटे पहाटे
आटपाटनगराची जनता अंचबित!. खुद्द घड्याळकाकासुद्धा आश्र्चर्यचकित आहेत, एका काट्याच्या घड्याळाच आता काय करावे. जनता अजूनही संभ्रमात आहे कि खरोखरच घड्याळाचा काटा कमलदलासोबत आहे कि हि सारी घड्याळकाकांची गणितं आहेत.(कारण आतापर्यंत घड्याळकाकांनी बऱ्याच जणांचे बारा वाजवले आहेत 😊). आटपाट नगरात लोकशाही आहे. राजा निवडणुकीतून निवडला जातो. गेल्या काही वर्षांत कमळ व धनुष्यबाण सोबत निवडणूक लढवित होते. ह्यावेळीसुद्धा एकत्रच लढले. आटपाट नगराने त्यांच्या युतीला निवडूनही दिले. पण कमळाने वचन (?) दिल्याप्रमाणे अर्धे तळे देण्यास नकार दिल्याने, त्यांनी कमळराजाचा पाठिंबा काढून घेतला.
त्यात सर्वात जास्त गोची धनुर्धरांचीच झाली. घड्याळकाका उलटसुलट काटे फिरवत होते, त्यामुळे धनुर्धरांना नेम कुठे धरावा हेच कळेनासे झाले. धनुष्यबाण घेऊन घड्याळ बांधलेल्या हातासोबत राज्य करण्याचा त्यांचा मनसुबा होता. आता तर काय सगळच मुसळ केरात! तशीही आताशा बाणांची टोकही बोथट झालीयत, त्या बाणांनी कमळालासुद्धा ईजा होईल कि नाही शंकाच आहे आणि धनुष्यबाणापेक्षा ते चालवणारा योद्धा महत्वाचा असतो. सध्यातरी काहि वाचाळवीर सोडले तर कोणी पराक्रमी धनुर्धर दिसत नाहिये.
दूरवर कुठेतरी इंजिनाच्या शिट्टीचा आवाज येतोय. पण बुलेट ट्रेनच्या स्वप्नात रमलेल्या नगरवासियांना लोकल इंजिनाच कुतूहल राहिलेल नाहीय. आटपाट नगराची जनता आता सिंहासनाकडे डोळे लावून बसलीय. रात्री एक काट्याच घड्याळ घेऊन आलेला कमळधारी राजा किती दिवस राज्य करणार. 😍
तुमची प्रतिक्रिया लिहा