मित्रा तू दिलेल्या पेनलज्जेस्तव लिहितोय, अन्यथा विद्यार्थी मास्तरांना काय शिकवणार? प्रसादला मास्तर म्हणतात कारण आमचं शालेय शिक्षण संपलं तरी त्याचं इतरांची शाळा घेणं सुरूच आहे. 📖
रसायनशास्त्राचा उपयोग करून घरगुती वाईन बनविणारा हा मद्यप्रेमी. मद्याविषयी अज्ञानी असणाऱ्यांनी लक्षात घ्या, मद्यप्रेमी आणि मद्यपी हे समानार्थी शब्द नाहीत. तसेच घरी स्वत:साठी वाईन बनविणे आणि हातभट्टी लावणे यामध्ये जो फरक आहे तो फरक त्या क्षेत्रातील लोकांनाच कळेल, त्यामुळे इतरांनी हँग ओव्हर करून घेऊ नये. 🍷
प्रसादकडे फक्त मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवीच नाही तर त्याला इंजिनीअरिंगची मनापासून आवड आहे. त्या ज्ञानाचा वापर करून तो घरबसल्या काही यांत्रिक करामती करत असतो. कधी मशिन्स बनवतो. कधी कधी तर तो इसापनीती मधल्या कोल्ह्याकडून आंबट द्राक्षं घेऊन, द्राक्षाच लोणचंदेखिल बनवतो. अशी ही बनवाबनवी! 😎
तुम्ही सगळे प्रसादला चांगलेच ओळखून आहात. परमेश्वराने देखणेपणाबरोबरच गायन, चित्रकला, वक्तृत्व , हुशारी, अभिनय असे बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्व घडविले. त्यातील किती गुणांना त्याने वाव दिला? हा भाग अलाहिदा! आमच्या मुलांच्या शाळेत स्नेहसंमेलनातील नाटकांत स्त्रीवेशातील मुख्य भूमिका म्हणजे प्रसादचा हातखंडा. आमचा बालगंधर्वच जणू! मला वाटतं तो आजही स्त्रीवेशात एखाद्या हळदीकुंकू समारंभात बेलाशक खपून जाईल. प्रसाद, प्रयत्न करायला हरकत नाही. (अर्थात तुझ्या स्वत:च्या जबाबदारीवर!) 😉
आमच्या दहावीच्या वर्गात संस्कृत समजणारे जे मोजके ॠषीमुनी होते त्यातला हा एक. त्याने वाचनाचा छंद बालपणापासून जोपासलाय. माझ्या आठवणीप्रमाणे शाळेत असताना त्याने घरी स्वत:चे वाचनालय सुरू केले होते. अशा ह्या गुणी बाळाने कॉलेजमध्ये काय गुण उधळले असतील याविषयी विकास आणि भैय्यासाहेबच सांगू शकतील. उदा. पांढऱ्या टॉपवर लाल रंगाची फुलं शोधणे. असो! आपुनको क्या? 🤪
तर असा हा आपल्या ग्रुपला लाभलेला प्रसाद! सर्वांनी लाभ घ्यावा...वाढदिवसाच्या केकचा.🍰
शैका3 years ago
विनायक3 years ago
रविदत्त3 years ago
संजय डी.3 years ago
विलास के.3 years ago
गणेश3 years ago
अवधूत3 years ago
सुनील3 years ago
वसंत3 years ago
विकास सी.3 years ago
गीता3 years ago
दयानंद3 years ago
संजय के.3 years ago
अभय3 years ago
प्रसाद3 years ago
प्रदीप3 years ago
नेत्रा3 years ago
संध्या3 years ago
महेश3 years ago
समीर3 years ago
राजश्री3 years ago
अनिल3 years ago
अभिजित3 years ago
👌😀😅3 years ago
प्रशांत3 years ago
शैलेश के.3 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा