सोशल डिस्टन्सिंग हा सध्या कोरोनाच्या अवकृपेमुळे बनलेला परवलीचा शब्द. कोरोनाने भारतातच नाहीतर संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे. त्यावर सुरक्षिततेचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग करणे गरजेचं आहे. ठीक आहे! पण भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्येच्या देशात ते कितपत शक्य होईल? म्हणूनच म्हटलं सोशल तितकं सोसायचं.
काही दिवसांपूर्वी व्हाटसअपवर एक फोटो पाहिला होता. त्यात सो.डी. चे चौकोन काढले होते. रांग चौकोनांची आणि गंमत म्हणजे ज्या चौकोनात माणसांनी ऊभं रहावं अशी अपेक्षा होती, त्यात चक्क लोकांच्या चप्पला होत्या . रांगेतली माणसं सावलीत सोशल गॅदरींग करत होती. कोरोना त्या चौकोनात लोकांना शोधून रडकुंडीला आला!
मध्यंतरी लॉकडाऊन काळात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी मात्र मद्यपींनी न भूतो न भविष्यती असं दारूण शिस्तीचं प्रदर्शन केल होतं. अशीच शिस्त लोकांनी बेष्ट बसेसला रांग लावताना दाखवली. पण दुर्देवाने बस मध्ये चढताना झालेल्या गर्दीत मात्र काही कोरोने चिरडून मेले. मुंबईची गर्दी काय असते, ते लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू झाल्यावर कळेल त्या कोरोनाला. कोणाचा मास्क कोणाच्या तोंडाला आहे तेच कळणार नाही.
मास्कवरून आठवलं आता लोकांचे डोळे वाचता यायला हवे हो! मास्कमुळे चेहरा म्हणून फक्त डोळेच दिसतात ना! तरूणपणी आँखो आँखोमें इशाऱ्यांचा सराव असेल तर सोप्प जाईल! त्या दिवशी मार्केटमध्ये जुनी मैत्रीण दिसली होती मास्क लावून. तिनं मला ओळखलं कि नाही माहित नाही. पण मी तिला ओळखलं डोळ्यांवरून आणि हसलोसुद्धा गालातल्या गालात (म्हणजे मास्कातल्या मास्कात) आता वयोमानानुसार दृष्टी कमजोर झाली असेल, पण बाज़ कि नजर अजून तशीच आहे. (अहो बाजीरावं कुठे बघताय? आपल्याला कोरोनाशी लढायच आहे , करीनाशी नाही.) कोणाचं काय तर कोणाचं काय? असो !
लॉकडाऊन होतं तोपर्यंत एक मर्यादित लोकसंख्या घराबाहेर पडत होती. पण आता निर्बंध उठवल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा बोऱ्या वाजणारचं. लोकं घरात तरी किती दिवस बसून राहणार? इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती. वैद्यकशास्त्राला कोरोनावरील उपाय सापडेल तेव्हा सापडेल, तोपर्यंत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर राहणे एवढचं आपण करू शकतो. आता जास्त जबाबदारीने वागणं आवश्यक आहे.
सोसल तेवढ सोशल डिस्टन्सिंग ठेवाच. मात्र मना-मनांमध्ये अंतर पडू देऊ नका.
विनायक5 years ago
गीता5 years ago
संजय डी.5 years ago
प्रदीप5 years ago
अवधूत5 years ago
समिता5 years ago
समीर5 years ago
प्रशांत5 years ago
वर्षा एस.5 years ago
गणेश5 years ago
संजय के.5 years ago
सुनील5 years ago
प्रसाद5 years ago
विलास पी.5 years ago
विकास सी.5 years ago
दयानंद5 years ago
रविदत्त5 years ago
वर्षा डब्ल्यू5 years ago
विनय5 years ago
नीना5 years ago
राजश्री5 years ago
नरेश5 years ago
अभिजित5 years ago
तुमची प्रतिक्रिया लिहा