नेत्रा, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!! 💐

अजून १ वर्ष, वय ह्या खात्यात जमा झालं बुवा ! ५५ की ५६ याकडे लक्ष न देता जीवन इंटरेस्ट घेऊन जगायचं. तू बॅंकेतच नोकरीला आहेस म्हटल्यावर इंटरेस्टची चिंताच नाही. आनंदाचा ओव्हरड्राफ्ट तुला सदा लाभो! 👍

शाळेतली हुशार, तल्लख ( ऐकीव माहिती 😊) तू आजही तशीच आहेस. रहायला नवी मुंबईत गेलीस तरी मनातली काळाचौकी काही जाणार नाही. बिनधास्त रोखठोख स्वभाव असा की बॅंकेत अधिकारी असलीस तरी आमच्यासाठी 'नेत्राभाईच' ! 👊

बँकेतली खाती तू किती नीट सांभाळतेस माहीत नाही, पण 'मैत्रीखाती' मात्र छान जपलीयसं. त्याचबरोबर प्रापंचिक जबाबदाऱ्यादेखिल. आजीची भूमिका निभावण्यासाठी तुला चक्क दुबईहून बोलावणं आल होतं म्हणे. आणि हो तुझ्या मुलाची भारतीय नौदलात निवड झाली ही तुझ्यासाठी अजून एक अभिमानाची बाब. अगदी फिक्सड डिपॉझिट मध्ये ठेवण्यासारखे हे सुखाचे क्षण असतात, ज्यावर आनंदाच व्याज आयुष्यभर मिळत रहातं!

बर, आता माझा लंच ब्रेक आहे त्यामुळे काउंटर बंद करतो. तोपर्यंत मित्रमैत्रिणींना पार्टी देण्यासाठी बॅंकेची एखादी स्किम आहे का शोधून ठेव. लाभार्थी वाट पहात आहेत. 😀

तळटीप: ग्राहकांना सूचित करण्यात येते की नेत्रा मॅडमच्या वाढदिवसानिमित्त आज बॅंकेचे कामकाज नेहमीप्रमाणे रमतगमत सुरू राहिल. 😍
२१ मार्च २०२६
You can Like, Share & Comment
- संतूवाणी

शुभेच्छा पत्रं

तुमची प्रतिक्रिया लिहा

वाचकांचे अभिप्राय

रविदत्त2 months ago

संतोषराव लय भारी👌

नेत्रा2 months ago

अरे एव्हढे सुंदर माझ्या बद्दल लिहिलेस. खरच मार्च महिन्यातली पोरं हुषार 🤭🫡

वर्षा2 months ago

एकदम झकास 😀👏

निकेता2 months ago

As always khup sundar

सुनील2 months ago

नेहमीप्रमाणे खुमासदार. Short and sweet. लिखते रहो यार 👌🏼👌🏼👌

नरेश2 months ago

अतिसुंदर

राजश्री2 months ago

फारच छान
त्या धर्माने बाकीच्या वाढदिवसांच्या पोस्टचे परत वाचन झाले

गीता2 months ago

संतोषने सुंदर लिहिले आहे. आणि आणि नेत्रा भाई ने स्वतःच कौतुक करून घेतलय 😜

मनीषा2 months ago

संतोष, नेहमी प्रमाणे छान लिखाण 👍😊

प्रकाश2 months ago

खुमासदार......🌹

कीर्ती2 months ago

👌

विलास के 2 months ago

👌

दयानंद2 months ago

👌

प्रिया2 months ago

👌

विनय2 months ago

👌
Read more in this section:
नरेशसुनीलविनयदिगंबरअभिजितप्रशांतरविदत्तविलास पी.अभयविलास के.समीरहेमंतसंजय केमहेशविनायकप्रसादनीनास्वप्नाअनिलअजितविजयप्रदीपसायमनप्रकाशविकास सी.गीतासंजय डीसंतोष एमगणेशविवेकानंदअदृश्यअनितावर्षाराजश्रीवसंतमाधवनेत्रा
Close Video ❌
Share