अजित, म्हणजे ज्याला कोणी जिंकू शकत नाही असं म्हणतात. (मी तर त्याला कॅरममध्ये कितीवेळा हरवलंय 😂) पण आपला अजित मात्र प्रेमाने सगळ्यांना जिंकतॊ. स्वभावाने मनमोकळा, निगर्वी. मित्रांना मदत करायला नेहमीचं तत्पर. मैत्रीमध्ये छक्के-पंजे न करता जे असेल ते मनातं न ठेवता सांगणारा.
माझ्याच शाळेचा शिवाजी विद्यालयचा माजी विद्यार्थी, म्हणजे हुशारी तर ओघानेच आली. एखादा जोक आवडला तर खळखळून हसणारं. हसण्यावर अजिबात ताबा नाही. त्याच्याबरोबर विनोदी नाटकाला गेलात तर बाकीच्या प्रेक्षकांसाठी तुम्हीच हास्यास्पद ठराल एवढा हसतो. मित्रा, आयुष्यात असाच हसत रहा! 😁
शाब्दिक काड्या करण्यात पटाईत. नृत्यकलेत म्हणजे वरात-डान्समध्ये पारंगत. निवेदनकलेची आवड. तसेच त्याच्या शेजारीच राहणाऱ्या गायक कलावंतांकडून कडून प्रेरित होऊन अधून मधून गायनक्षेत्रातही योगदान देत असतो. तुम्हाला अजितच गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही स्वत:च्या जबाबदारीवर ऐकू शकता.😉
अजितच्या मित्रपरिवारामध्ये लहानथोर सगळेच सामील आहेत. वयाचं बंधन नाही. काही वर्षांपूर्वी अजित मित्रांसोबत जास्त असायचा (लग्नापुर्वी). सध्या कोरोनाला घाबरून बायकोसोबतच असतो. (कदाचित बायकोलासुद्धा घाबरत असेल 🤪) असो !
मित्रांप्रमाणेच नातेवाईकांत देखिल अजित सर्वांचा लाडका आहे. एकदम हिरा आहे. (म्हणजे अमिताभच्या सूर्यवंशम मधला हिरा ) अजित के पास आज भगवान का दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है (बस डोके पे बाल नाही है, लेकिन डोका तो है ना कभी ना कभी आ जायेंगे 👍)
बरंय मंडळी तर जास्त डोक्यात न जाता इथेच थांबतो. अजित पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! Enjoy 💐🎂🕺🎊🎉
तुमची प्रतिक्रिया लिहा